गजापूर घटनेतील आरोपींवर कारवाईची मागणी भर पावसात भिजून आष्टीत मुस्लिम समाज एकवटला

 गजापूर घटनेतील आरोपींवर कारवाईची मागणी
भर पावसात भिजून आष्टीत मुस्लिम समाज एकवटला






------------------

आष्टी (प्रतिनिधी) - कोल्हापूर येथील विशाळगडा पासून 3 किमी अंतरावर असलेल्या गजापूर आणि मुस्लिमवाडी येथे जमलेल्या दहशतवादी जमावाने अतिक्रमणाच्या नावाखाली मुस्लिम समाजाच्या लोकांची घरे, धार्मिक स्थळे व गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. यामध्ये घाबरलेल्या निरपराध लोकांना घरे सोडून पलायन करण्याची वेळ आली. सदरील घटना निंदनीय असून समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी आहे. यामुळे घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन करावे तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी या मागणीसाठी आष्टीतील मुस्लिम बांधवांनी भर पावसात मोटारसायकल रॅली काढून निषेध व्यक्त केला आहे.



                   रविवार दि.14 जुलै रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी विशाळगडा वरील अतिक्रमण काढण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर येथे संभाजी महाराज अधिकाऱ्यांशी बोलत असताना काही समाजविघातक वृत्तींनी गजापुर येथील मुस्लिम समाजाच्या घरांवर हल्ला करून त्यांच्या घरांची, गाड्यांची, लहान मुलांच्या खेळणीची व शिवकालीन असलेल्या रेहान मलिक दर्ग्याची तोडफोड केली आहे. या घटनेत निरपराध लोकांनावर जीव मुठीत धरून घरे सोडून जाण्याची वेळ आली. सदरील घटनेमुळे समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. गजापूर येथील घटनेच्या निषेधार्थ व नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शुक्रवार दि 19 रोजी दुपारी दोन वाजता येथील ईदगाह मैदान ते तहसील कार्यालय अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. सदरच्या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रमोद गायकवाड यांना यावेळी देण्यात आले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.