रासप पक्षनिरिक्षक म्हणून डाॅ. शिवाजी शेंडगे यांची नियुक्ति
-----------------------------
आष्टीसह राज्यात १०९ मतदार संघाच्या निवडणुक रिंगणात
-----------------
कडा / वार्ताहर
---------------
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेश सरचिटणीस डाॅ. शिवाजी शेंडगे यांची रासप अध्यक्ष महादेव जाणकर यांच्या आदेशानुसार आष्टी मतदार संघाची चाचपणी करण्यासाठी पक्ष निरिक्षक म्हणून पत्राकडे नियुक्ति जाहीर करण्यात आली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या उपस्थितीत राज्यातील जिल्हास्तरिय प्रमुख पदाधिका-यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत रासपचे प्रदेश सरचिटणीस डाॅ. शिवाजी शेंडगे यांची राजकीयदृष्टी बहुचर्चित असलेल्या आष्टी मतदार संघात पक्ष निरिक्षक म्हणून पक्षाकडून पत्रकाव्दारे नियुक्ति करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाकडून महाराष्ट्रातील जवळपास १०९ विधानसभा मतदार संघात चाचपणी करण्यात आली. यामध्ये आष्टी मतदार संघाचा समावेश आहे. यासर्व विधानसभा मतदार संघात रासप बहुजन समाजाला घेऊन ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे डाॅ. शिवाजी शेंडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले. आष्टी, पाटोदाव शिरुर मतदार संघाच्या पक्ष निरिक्षकपदी नियुक्ति झाल्याबद्दल शेंडगे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
---------------%%---------


stay connected