मुस्लीम उमेदवारांना द्या पुण्यातील दोन जागा !
'मुस्लीम राजकीय मंचा'च्या चिंतन बैठकीत ठराव मंजूर
तेजवार्ता न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात असलेल्या २१ मतदारसंघांपैकी आगामी विधानसभा निवडणुकीत किमान २ विधानसभा मतदारसंघांत मुस्लिमांना इंडिया आघाडी व घटक पक्षांतर्फे अधिकृत उमेदवारी देण्यात यावी, यांसह पाच ठराव चिंतन बैठकीत शहरातील आजी-माजी नगरसेवक धर्मगुरू सामाजिक कार्यकर्त्यांनी एकमताने मंजूर केले.
पुणे कसबा पेठ कागदीपुरा मुख्तार शेख यांच्या मुख्यालयात विविध मुस्लीम धर्मगुरू, धर्मनिरपेक्ष इंडिया आघाडी घटक पक्षात काम करणारे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक पार पडली. या चिंतन बैठकीच्या अध्यक्षपदी माजी विशेष पोलिस महानिरीक्षक अब्दुल रहमान तसेच काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) व इतर घटक - पक्षांचे अनेक मुस्लीम आजी-माजी
नगरसेवक उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४८ पैकी एकही मुस्लीम उमेदवार न दिल्याने व विधान परिषदेतील २ मुस्लीम उमेदवार यांचा कार्यकाळ संपल्याने त्या ठिकाणी
पुन्हा मुस्लिमांना संधी देणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता पूर्णपणे मुस्लीम समाजाला डावलले. विधान परिषद निवडणूक मुस्लीममुक्त केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीत मांडलेले ठराव
■ पुणे शहर व जिल्ह्यात असलेल्या २१ मतदारसंघांपैकी आगामी विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये किमान २ विधानसभा मतदारसंघांत मुस्लिमांना इंडिया आघाडी व घटक पक्षांनी अधिकृत उमेदवारी द्यावी.
■ पुणे शहर व जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी पुणे शहरातल्या ८ मतदारसंघांतील प्रमुख मुस्लीम धर्मगुरु, धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षाचे पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनांचा लवकरच पुण्यात महामेळावा आयोजित केला जाईल.
■ आगामी विधानसभा महाराष्ट्र निवडणुकीत मुस्लिमांना सत्तेत भागीदारी द्यावी याकरिता मुस्लीम राजकीय मंचाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची व घटक पक्षांची लवकरच भेट घेऊन मुस्लिमांच्या प्रतिनिधित्वाबाबत चर्चा करतील.
■ मुस्लीम समाजाला राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व पक्ष पातळीवर लोकसंख्येनुसार महाराष्ट्रात प्रतिनिधित्व देण्यात यावे


stay connected