ऊसतोडणी महिलेच्या ओळखीचा फायदा घेऊन महिलेवर अत्याचार
अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आष्टी प्रतिनिधी- तालुक्यातील एका गावातील 26 वर्षीय विवाहित महिला म्हाडा कारखाना येथे ऊसतोडणीसाठी गेली होती तेथील व्यक्तीसोबत तोंड ओळख झाली या ओळखीचा गैरफायदा घेत त्या आरोपीने आष्टी तालुक्यातील तिच्या मुळ गावी येऊन महिलेवर बाहेर गावी गाडीत नेऊन 7 दिवस अत्याचार केल्याची घटना घडली आहे.याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंभोरा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की 26 वर्षीय विवाहित महिला ऊसतोडणी साठी गेल्यानंतर म्हाडा जि.सोलापूर येथील आरोपी चे नाव महिलेला माहिती नाही तोंड ओळख झाली व महिला ऊसतोडणी करुन गावी परतली परंतु गावाकडे आल्यानंतर त्या आरोपीने ओळखीचा फायदा घेऊन 7 जूलै 14 जुलै दरम्यान बाहेर गावी गाडीत नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत बुधवार दिनांक 17 जुलै रोजी अंभोरा पोलीस ठाण्यात 64 कलम (2)(1) भारतीय न्याय संहिता 2023 नुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे हे करत आहेत.
stay connected