डॉ.अभय शिंदे यांचे इंग्रजी पुस्तक जानेवारीत प्रकाशित होणार
आष्टी प्रतिनिधी............
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.अभय शिंदे यांच्या इंग्रजी अनुवादित कवितांचे पुस्तक दिनांक 01जानेवारी 2025 रोजी प्रकाशित होणार असून कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या कुसुमाग्रज पुरस्कार प्राप्त झिंदाबाद... मुर्दाबाद या गाजलेल्या कवितासंग्रहातील 25 कवितांचा हा अनुवाद आहे.मलपृष्ठावर प्रसिद्ध लेखक,कलावंत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीश कर्नाड यांचे इंग्रजी भाषेतील अभिप्राय पत्र असून,आत संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे यांच्या शुभेच्छा लाभलेल्या आहेत.दरवर्षाप्रमाणे हंबर्डे महाविद्यालयात दि.01 जानेवारी नियोजित कवी संमेलनात एडवोकेट बी.डी.हंबर्डे साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून पुरस्काराचे मानकरी नागराज मंजुळे,सिसिलिया कारव्हॉलो,अजीम नवाज राही तथा सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,डॉ.गणेश पिसाळ,सर्व मान्यवर संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या हस्ते प्रा.डॉ.अभय शिंदे यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
stay connected