आष्टीचे भूमीपुत्र कैलास जोगदंड यांना मावळ लोकसभा मतदारसंघातुन उमेदवारी जाहीर
आष्टी/प्रतिनिधी
तालुक्यातील टाकळसिंगचे भुमीपुत्र व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाड्याचे नेते कैलास जोगदंड यांना मावळ लोकसभा मतदारसंघातुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने उमेदवारी जाहीर झाली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे व राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक लढणार असल्याचे कैलास जोगदंड यांनी सांगीतले आहे.
सध्या देशभरात वाढती महागाई, बेरोजगारी,मराठा आरक्षणाचा प्रश्न,दलितांवर वाढत चाललेले अन्याय अत्याचार तसेच आपल्या देशाचे संविधान धोक्यात आहे या व अशा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी आम्हांला आता निवडणुकीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही.
ही निवडणुक नसुन आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा लढा आहे.या भारतीय जनता पार्टीने आपल्या सत्तेचा गैरवापर करत अनेक दिग्गज नेत्यांना ईडी सारख्या कारवाया करत भय दाखवून आपल्या पक्षात ओढवून घेतले आहे.
आता रात्र वैर्याची नसून दिवस सुद्धा वैर्याचा आहे.
त्यामुळे माझ्या सर्व बांधवांना आव्हान करतो की, येणाऱ्या काळात या जातीवादी पक्षाला हद्दपार करण्यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चाला असे आवाहन ही मावळ लोकसभेचे उमेदवार कैलास जोगदंड यांनी केले आहे.
stay connected