असदोद्दीन काझीचा पहिला रोजा पूर्ण
आष्टी - प्रतिनिधी -
येथील काझी गल्ली येथील रहिवासी असलेले रौफोद्दीन हाफिजोद्दीन काझी यांचे चिरंजीव असदोद्दीन काझी (वय ७) याने आयुष्यातील पहिला रोज़ा पुर्ण केला. घरातील मोठी मंडळी दररोज़ पहाटे उठून सहरी करत रोज़े धरतात. त्यांच्यासोबत लहान मुलेही उठतात आणि सहरी करून रोज़े धरतात. अशाच प्रकारे अवघ्या सात वर्षीय असदोद्दीन याने ही आयुष्यातील पहिला रोज़ा ठेवून पूर्ण केला. एकीकडे सूर्य आग ओकत असताना व तापमान ४० अंशापेक्षा जास्त असताना जिथे भल्याभल्यांच्या जिवाची लाही लाही होत आहे तिथे इस्लाम धर्माचा सर्वात पवित्र महिना म्हणून गणला जाणारा रमज़ान अशा उष्ण वातावरणात सुरू आहे. अशा वातावरणामध्ये दोन चार तास जरी माणूस पाण्याविना राहिला तर त्याला अशक्तपणा आल्यासारखे वाटते. मात्र अशा वातावरणात सुद्धा पाच ते अकरा वर्षातील लहान मुले रोजा ठेवण्याचे धाडस दाखवीत असल्याचे सगळीकडे दिसून येत आहे. यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत रोज़ा ठेवल्यानंतर रोज़ेदारांना अल्लाहकडून अदृश्य शक्ती मिळते यावर शिक्कामोर्तब होतो. यामुळेच लहान मुलेही रोजा ठेवण्यास समर्थ ठरताना दिसतात. अशाच प्रकारे असदोद्दीन ने ही रोजा ठेवल्याने त्याचे आजोबा हाफिजोद्दीन काझी, वडील रौफोद्दीन काझी, चुलते अजहरोद्दीन काझी, समिरोद्दीन काझी, हाजी बुक डेपो तथा राॅयल एजन्सी चे संचालक हकीम अब्दूल कय्युम (नाना), मुहीबोद्दीन काझी, वजहातोद्दीन काझी
व नातेवाईकांनी असदोद्दीनचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
stay connected