विनापरवाना खडी क्रशर व खदान उत्खनन तात्काळ बंद करा - भाई शिवाजीराव सुरवसे
बीड जिल्ह्यातील परवानगी नसताना चालू असलेल्या खडी क्रशर आणि खदान उत्खनन करणाऱ्या लोकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणे आणि काही कोटीचे थकीत सर्व करणे तसेच मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदारावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी बीड यांनी दिल्याने खडी क्रेशर चालकांसह अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत .
अॅड अजित देशमुख, सदस्य, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती, बीड यांनी याबाबत सवाल उपस्थित केल्यानंतर जिल्हाधीकारी बीड यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिल्याने विनापरवाना खडी क्रेशर वाल्यांचे धाबे दणाणले आहे .
अनेक वर्षांपासून विवीध ठिकाणी सुरु असलेल्या अवैध खडी क्रशर व खदान उत्खनन करणाऱ्यांनी कोटींचा महसूल बुडवला असुन शेजारच्या शेतकऱ्यांना व नागरिकांना धुळीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते . मात्र अनेक खडी क्रशर चालक व खदान उत्खनन करणाऱ्यांचे राजकीय हितसंबंध व दारागीरी मुळे कोणी पुढे येऊन तक्रार करीत नव्हते आता मात्र जिल्हाधिकारी यांनी याबाबत कडक आदेश दिल्याने अवैध खडी क्रशर व उत्खनन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे .
सदरील निवेदनामध्ये अॅड देशमुख यांनी नमुद केल्यानुसार, बीड जिल्ह्यातील परवानगी नसताना चालू असलेल्या खडी क्रशर आणि खदान उत्खनन करणाऱ्या लोकाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणे आणि काही कोटीचे थकीत सर्व करणे तसेच मा .जिल्हाधिकारी याच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या वीज मंडळाच्या अधिका-यांसह जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करणे बाबत कळविले आहे.
जिल्हयातील अनाधिकृत व मुदत संपुष्टात आलेल्या सर्व खाणपट्टा व स्टोन क्रशर तात्काळ सील करून केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ सादर करणेबाबत संदर्भिय पत्राद्वारे सुचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत काही अनधिकृत व मुदत संपुष्टात आलेल्या खाणपट्टा व स्टोन क्रशर सील करून अनुपालन अहवाल सादर केलेले नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब असून या प्रकरणी दिरंगाई व हलगर्जीपणा दिसून येत आहे. असे पत्रान्वये जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना खडसावले आहे .
आष्टी तालुक्यातील दौलावडगाव सालेवडगाव सिमेवरील खडीक्रशर तहसिलदार आष्टी यांनी सिल केले असुन विज पुरवठाही बंद करण्यात आलेला आहे . तसेच इतरही विनापरवाना व अनाधिकृत खडी क्रशर व खदान उत्खनन बंद व्हावेत व खदान मध्ये बेकायदेशिर तयार करण्यात आलेले शेततळे व ज्या अधिकार्यांनी मंजूर केले त्यांनाही निलंबीत करावे अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष भाई शिवाजीराव सुरवसे यांनी केली आहे .
stay connected