डिझेलच्या टँकरने दुचाकीस्वाराला चिरडले ; दोन जण जागीच ठार
-------------------------------------
आष्टी/प्रतिनिधी
होळीच्या पूर्वसंध्येला अहमदनगर धामणगाव मार्गे बीड राज्य महामार्गावर भयानक अपघात होऊन त्यात दोन जण जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, कडा येथील काम आवरून धामणगांव मार्गे पाटोदा तालुक्यातील संकुडवाडीला निघालेल्या दुचाकीस्वाराला धामणगांव येथे हात करून लिप्ट मागत बसून जात असताना काही अंतरावर गेल्यावर सदर दुचाकीला टँकरने जोराची धडक दिली त्यामुळे समोरासमोर झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड-नगर राज्य महामार्गावरील डोईठाण येथील शिवनेरी चौकात रविवारी सायंकाळी चारच्या दरम्यान घडली. अनिल विठ्ठल तरटे वय १९, महादेव गायकवाड अंदाजे ४०, असे मृतांचे नावे आहेत. पाटोदा तालुक्यातील संकुडवाडी येथील महादेव गायकवाड हे कडा येथून काम आवरून धामणगांव मार्ग गावाकडे जात असताना धामणगांव येथे डोईठाण येथील एकाने हात करून लिप्ट मागितल्याने त्याला दुचाकीवर घेऊन गावाकडे रविवारी सायंकाळी चारच्या दरम्यान जात असताना बीड नगर राज्य महामार्गावरील डोईठाण परिसरात शिवनेरी चौकात बीड येथे डीझेल खाली करून अहमदनगरच्या दिशेने जात असलेल्या टँकर क्रमांक एम. एच १६ सी.सी.७६३१ याची जोराची धडक दुचाकी बसल्याने झालेल्या अपघातात दोघाचा जागीच मृत्यू झाला असून अपघात घडताच टँकर चालक पसार झाला होता. त्यानंतर कडा पोलिस चौकीच्या पोलिसांनी त्या चालकाला टँकर सह ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन कडा पोलिस चौकीचे पोलिस नाईक विकास जाधव, पोलिस अंमलदार सचिन गायकवाड, पोलिस अंमलदार दिपक भोजे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.
stay connected