बीड लोकसभेसाठी प्रा. ईश्वर मुंडे यांना मतदारांची पसंती

 बीड लोकसभेसाठी प्रा. ईश्वर मुंडे यांना मतदारांची पसंती



केज (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्ह्याचे स्थान महत्वाचे मानले जाते. बीड जिल्हा स्व. गोपीनाथराव मुंडे व खा. शरद पवार यांच्या विचारांचा मनाला जातो. जिल्ह्याचे नेतृत्व आपणाकडे राहावे या साठीचा मुंडे विरुध्द पवार सत्ता संघर्ष महाराष्ट्राला परिचित आहे.


बीड जिल्ह्याचे नेतृत्व व बीड लोकसभेचा खासदार आपल्या कडे राहावा यासाठी खा. शरद पवार वेग वेगळे डाव खेळतात परंतू मागील पंधरा वर्षा पासून त्यांना यश आलेले नाही. परंतू या वेळी उमेदवारी वेगळा सामाजिक डाव टाकून बीड लोकसभा जिंकण्याचा पवारांचा मनसुबा यशस्वी होऊ शकतो. बीड लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून माजी मंत्री जयसिंग गायकवाड, सुशीलाताई मोराळे, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. ईश्वर मुंडे, रवी राठोड, भाई थावरे हे जन संपर्क करत आहेत. सध्या प्रा. ईश्वर मुंडे यांनी जन संपर्कात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. प्रा. ईश्वर आनंदराव मुंडे हे स्वच्छ प्रतिमेचे उच्च शिक्षीत, शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी या प्रशासकीय कामाचे अनुभवी, जिल्ह्यातील कर्मचारी संघटनां, सामाजिक संस्था, संस्था चालक महामंडळ, सार्वजनिक ग्रंथालय संघटना, पर्यावरण संवर्धन संघटना, संत सांप्रादाय, स्वत:च्या शाळा-कॉलेज मधील विद्यार्थी व पालक, वेळोवेळी संकटकाळात गरजवंतांना केलेली मदत, निराधारांसाठी केलेले सामाजिक काम, तालुकाध्यक्ष ते राज्य प्रमुख या पदावरून केलेले राजकीय काम तसेच स्वतःच्या समाजाचा मिळत असलेला पाठींबा या बाबींमुळे प्रा. ईश्वर मुंडे जनतेच्या पसंतीला उतरले आहेत. प्रा. ईश्वर मुंडे यांचा जन संपर्क वाढून त्यांनी बीड जिल्हयाचे नेतृत्व करावे या साठी राजकिय व सामाजिक कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेऊन त्यांना धार्मिक स्थळे, सांप्रादायीक कार्यक्रम, लग्न सोहळे तसेच आठवडा बाजर अशा गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊन जनतेला परिचय करून देत आहेत. प्रा. ईश्वर आनंदराव मुंडे यांच्या या झपाटयाने वाढत असलेल्या जन संपर्कावरून ते बीड वासियांच्या पसंतीला उतरले आसल्याचे दिसत आहेत.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.