२०१९ च्या निवडणुकीत आपल्यावर अन्याय झाला २०२४ ला धोंडे साहेब च उमेदवार युद्धपातळीवर कामाला लागा अजय धोंडे च्या कार्यकर्त्यांना सूचना

 लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा.आ.भिमराव‌ धोंडेचे दररोजच कार्यकर्ता बैठका व सरकारचे कामे घरोघरी पोहचविण्याचा धडाका सुरू



खा.प्रितमताई मुंडे च लोकसभेच्या उमेदवार त्यांना संसदेत पाठवण्यासाठी त्यांच्या पाठिशी राहा - मा.आ.भिमराव‌ धोंडे 



२०१९ च्या निवडणुकीत आपल्यावर अन्याय झाला २०२४ ला धोंडे साहेबच उमेदवार युद्धपातळीवर कामाला लागा अजय धोंडे च्या कार्यकर्त्यांना सूचना




आष्टी ( प्रतिनिधी ):-

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 

आष्टी विधानसभा मतदारसंघाचे मा.आ.भिमरावजी धोंडे पायाला भिंगरी बांधल्या सारखं दररोज दौरा करत आहेत.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी कार्यकर्ता बैठक घेऊन  संवाद साधत आहेत.खा.प्रितमताई मुंडेच लोकसभेच्या उमेदवार असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास केला असून पुन्हा एकदा संसदेत पाठवण्यासाठी निवडून द्यायचे आहे. मोदी सरकारने मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत.मोदी की गॅरंटी त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केली आहेत.त्यामुळे पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी प्रितमताई मुंडे यांनी विजयी  करायचं आहे असे आवाहन केले. मी ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास केला असून पुढील २५ पिढ्यांची सोय केली आहे.वय झालय अस समजू नका तेवढ्याच जोमाने मी पण कामाला लागलो आहे.मागील निवडणुकीत भाजपातील लोकांनी गद्दारी केल्यामुळे पराभव झाला आता पराभवाचा वचपा काढण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे.असे प्रतिपादन मा.आ.भिमराव धोंडे यांनी दि.२ फेब्रुवारी रोजी नागतळा  येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केले. श्री संत वामनभाऊ महाराजांचे आशिर्वाद घेऊन नागनाथांच्या पावन भूमीत नागतळा येथील नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर सुदाम काका झिंजुर्के केशव गर्जे, सरपंच विष्णू दहिफळे,सरपंच शाहाबुद्दीन सर रभाजी गर्जे, सरपंच अशोक मिसाळ, बाबुराव आव्हाड,बाळासाहेब मिसाळ,भगवान गर्जे,बाबा गर्जे, अंकुश गर्जे, आश्रुबा शेकडे,नानाभाऊ नाकाडे, दत्तात्रय शेंडे, अशोक दहिफळे,भीमराव गोल्हार,बाबुराव कुत्तरवडे,छगन अण्णा तरटे,अमोल चौधरी,अभय गर्जे, बाबासाहेब गर्जे, माजी पंचायत समिती सदस्य बाळू मिसाळ, सत्यराम गावडे,अंकुश चेअरमन, पोपट गोल्हार, भगवानराव पाटील, आश्रुबा शेकडे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना मा आ.धोंडे म्हणाले की, लोकसभेच्या प्रितमताई आपल्या उमेदवार आहेत. निरीक्षक यांना बोललो आहे त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी परंतु आपल्या तालुक्यात त्यांना नावे ठेवणारी पिलावळ आहे ‌.खासदार फंड आला नाही खा. मुंडे यांनी त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याचा विकास झाला आहे.रेल्वे आली पुढे लवकरच धावेल,रस्ते, विविध विकास कामे केली मोदी सरकार कडून मोफत धान्य दिले जात आहे.भुमीहीन नागरिकांना  धान्य विकत घेण कठीण आहे याचा नागरीकांना फायदा होत आहे. पक्ष म्हणून भाजपमध्ये भेदभाव केला जात नाही.आष्टी पंचायत समितीत शेतकऱ्यांकडून पैसे घेतात विहरीसाठी रेट सुरू झाला आहे.पैसे कोण घेतय देयला नाही पाहिजे हे पैसे कुठे जातात यावर ही अखेर साहेब बोललेच १० ते १२ तारखेला आचारसंहिता लागणार आहे.मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या जिवनमानात सुधारणा झाली आहे.शेतकऱ्यांसाठी मुंबई ते दिल्ली पायी मोर्चा, शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी पाय फुटले बोट तुटले प्रश्न मार्गी लावून घेतले मी मतदार संघातील तुमच्या २५ पिढ्यांची मुलांची सोय केली आहे.अनेक मुले, डाॅक्टर, वकील, इंजीनियर, विविध क्षेत्रात घडले आहेत.मी ऐवढे काम करतो मग मला मत दिले पाहिजे ३० ते ३५ हजार मुले मी सुरु केलेल्या शिक्षण संस्थेत शिकतात जन्मला आलेल्या मुलांपैकी ७० टक्के मुले आपल्या शाळेत शिकतात मला पैसे कमवायचे असते तर बिअर बार काढले असते मी स्वतः २५ किमी शाळेत पायपीट करून शिकलो भविष्यात मुलाबाळांच्या शिक्षणासाठी गैरसोय नको म्हणून मी शाळांची सोय केली,रस्ते,पाझर तलाव,विहिर, वैयक्तिक योजना विकास कामे केली कुणी समजू नये वय झालय जोमाने काम करतोय आपल्या बैठकीचा प्रितमताईंना फायदा होणार आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळाल पाहिजे मी सर्वात अगोदर मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मागणी केली होती.आरक्षणाचा सरकार निर्णय घेईल माझा पाठिंबा आहे.मागील निवडणुकीत गद्दारी केली हा वचपा काढण्यासाठी तुम्ही साथ द्या नेटाने कामाला लागा अशा सुचना कार्यकर्त्यांना दिल्या युवा नेते भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अजय धोंडे म्हणाले की भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते म्हणून केंद्र सरकारच्या मागिल १० वर्षातील राबविलेले विकास कामे कार्यकर्ता म्हणून जनतेपर्यंत पोहचवायचे आहेत.सरकार बद्दल गैरसमज निर्माण होत आहे.परंतु मोदी सरकार ने विकास कामे केली आहेत.सत्ता पुन्हा आणायची आहे.बीड लोकसभेच्या प्रितमताईच उमेदवार आहेत.२०१९ पेक्षा जास्त लिड देऊन त्यांना संसदेत पाठवायचे आहे.आपल्या हक्काच्या नेत्या आहेत.२०१९ विधानसभेत आपल्या वर अन्याय केला साहेबांनी रस्ते, विकास कामे मोठ्या प्रमाणे केली येणाऱ्या विधानसभेत धोंडे साहेब हेच उमेदवार आहेत.आणि बाणी काही येऊ द्या आजपासुन च तयारी करायची आहे.लोकसभा नंतर विधानसभा आहे. अन्यायाचा बदला घ्यायची संधी आहे.निवडणुकीचा महासंग्राम सुरू झाला आहे. अडचण आली तर सांगा आता शांता राहायच नाही युद्धपातळीवर काम करण्यास सुरुवात करा अशा सूचना दिल्या.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या वतीने मा.आ.धोंडे यांचे पुष्पवृष्टी करुन स्वागत केले सर्व सुपर वॉरीअर्स,शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख,गण प्रमुख,बुथ समिती आदि मोठ्या मान्यवर उपस्थित होते








.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.