राष्ट्रीय फार्मसी शिक्षणदिना निमित्ताने भव्य रॅली चे आयोजन
नगर शहर व परिसरातील पंधरा फार्मसी कॉलेजच्या जवळपास २०००विध्यार्थ्यांच्या सहभागाने राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिना निमित्ताने दि.६/३/२०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता भव्यदिव्य रॅली चे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने फार्मसी बद्दल चौका चौकात जनजागृती पथनाट्य सादरीकरण करण्यात येणार आहे तसेच फार्मसी विषयक करियर व उपयोगिता बद्दलचे मार्गदर्शन फलक पण असणार आहे
रॅलीचा मार्ग हा सक्कर चौक, पुणे स्टॅन्ड, मार्केट यार्ड, बंगाल चौकी, दवा बाजार, माणिक चौक, वाडिया पार्क, टिळक रोड व सक्कर चौक असा असणार आहे, तरी नगर शहर व परिसरातील सर्व फार्मासिस्ट यांनी या रॅली मध्ये सहभागी होण्याचे आवाहन साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. अनिरुद्ध आडसुळ, संचालक, मा. कृष्णा आडसुळ आणि आडसुळ कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर चे प्राचार्य डॉ. तुषार शेळके यांनी केले आहे.


stay connected