लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुंडे यांची तात्काळ बदली करावी. - पँथर नितिन सोनवणे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुंडे यांची तात्काळ बदली करावी. - पँथर नितिन सोनवणे

---------------------------------------




तेजवार्ता वृत्तसंस्था

बीड जिल्हाधीकारी दीपा मुधोळ- मुंडे या बीडच्या जिल्हाधिकारी असुन त्या बीड च्या सुनबाई देखील आहेत. त्यामुळे ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितिन सोनवणे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असुन सद्या देशामध्ये लोकसभा निवडणूका जाहीर झालेल्या आहेत व त्यानंतर विधानसभा निवडणुक जाहिर होणार आहेत. मा. निवडणुक आयोगाच्या जिल्ह्याच्या रहिवासी परिपत्रका नुसार / आदेशानुसार जो असतो त्या अधिकाऱ्यास जिल्ह्यात काम करता येणार नाही. त्यांना बाहेर जिल्ह्यामध्ये बदली करुन पाठवावे असा नियम असताना व सदरीलच्या जिल्ह्याधिकारी यांचे पती ता. परळी जि. बीड येथील रहिवासी असल्यामुळे व त्यांच्या पतीचे नातेवाईक हे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये असल्याने तसेच त्यांच्या आडनावाचे लोकप्रतिनिधी हे संसद व विधानसभे मध्ये कार्यरत असल्याने निश्चितच शासकीययंत्रनेचा गैरवापर त्यांचेकडे कळत नकळत झुकला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्काळ लोकसभेची निवडणुक लागण्यापुर्वी व आचार संहिता लागण्यापुर्वी बीड जिल्हाधिकारी दिपा मुधोळ (मुंडे) यांची तात्काळ बदली करण्यात यावी.

सदरीलचा अर्ज मिळाल्यानंतर तात्काळ यावर कार्यवाही करावी. 8 दिवसात कार्यवाही न झाल्यास अपल्या विरोधात उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचीका दाखल केली जाईल. असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी दिले आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.