उद्या संत शिरोमणि शेख महंमद महाराज यांचा वाहिरा येथे भंडारा
---------------------------------------
आष्टी (प्रतिनिधि)आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे संत शिरोमणी शेख महंमद महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
फाल्गुन शुध्द नवमीच्या रात्री हिंदु मुस्लिम धर्मातील भाविक शेख महंमद महाराजांच्या समाधीवर चंदनलेप, फुलांचा हार व चादर अर्पण करुन यात्रोत्सवाला प्रारंभ होतो. तर दशमीच्या दिवशी ग्रामस्थांच्या वतीने नैवद्य (मलिदा) चा प्रसाद वाहिला जातो. या दिवशी महाराजांची पालखी मिरवणूक टाळ, मृदंगाच्या गजरात, आनंदी वातावरणात बंगल्यापासून समाधीपर्यंत येते. सर्व धर्मियांच्या
सहकार्याने यात्रोत्सवात आजही राज्यातील व राज्या बाहेरील सर्व धर्मिय भक्त सहभागी होतात.
यात्रेच्या दिवशी सकाळीच पुजा विधी करुन दर्शन बारी सुरु करण्यात येते. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे (भंडाऱ्याचे) आयोजन करण्यात येते. तसेच रात्री ९ ते ११ संत शेख महंमद महाराजांचे वंशज ह.भ.प. जब्बर महाराज, ह.भ.प. अब्दुल महाराज यांचे बंगल्याच्या प्रांगणात किर्तन होते. तर जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये सामाजिक प्रबोधनपर नाट्यकला रात्री ११ वाजता सादर करण्यात येणार आहे. मागील अनेक वर्षे पुणेकरांचे
विविध विषयांवरील नाटके या ठिकाणी सादर केली जात होती. या मध्ये संत तुकाराम चरित्र, संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र, कलगीतुरा आदी पट सादर करण्यात आले होते.
या वर्षी श्री सोमनाथ कलापथक रंगीत संगित भजनी भारूड मंडळ
मौजे. सडवली, पो. कुरूंज, ता. मावळ, जि.पुणे यांचा भारूडाचा कार्यक्रम होनार आहे
सदर यात्रा ही शाकाहारी आणि सद्विचाराची असल्यामुळे यात्रेमध्ये भक्तगण हा स्वतःहून स्वयं शिस्त पाळतो त्यामुळे समाजाचा समाजाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यामुळे यात्रा उत्साहाच्या व आनंदात पार प्रतिवरण ता पडते. वाहिरा येथील भंडारा म्हणजे जातीय सलोखा जोपासण्याचे काम करत आहे.
stay connected