PARBHANI | माळसोन्ना गावात भगरीतून ग्रामस्थांना झाली विषबाधा

 PARBHANI | माळसोन्ना गावात भगरीतून ग्रामस्थांना झाली विषबाधा




 परभणी  तालुक्यातील माळसोन्ना गावामध्ये मंगळवारी सायंकाळी एकादशी सप्ताहानिमित्त भाविकांना प्रसाद म्हणून भगरीचे वाटप करण्यात आले. ही भगर खाल्ल्यानंतर काही वेळाने अनेकांना उलटी, जुलाब, चक्कर येणे असे प्रकार सुरू झाले. हा त्रास अनेकांना होऊ लागला. त्यामुळे ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी उपचारासाठी परभणी गाठली. रुग्णांच्या प्रकृती प्रमाणे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करून उपचार केले जात आहेत. यात कोणीही गंभीर नाही. दरम्यान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक यांनी माळसोन्ना गावात जाऊन रुग्णांची भेट घेऊन माहिती घेतली. त्यांच्या तब्येतीचा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन आढावा घेतला आहे. तसेच योग्य ते उपचार करण्याचे आरोग्य विभागाला आदेश दिले आहेत.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.