डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा मंडळावर प्रा.डॉ.अशोक कोरडे यांची नियुक्ती
-------------------------------
आष्टी /प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर मधील परीक्षा विभागाच्या मंडळावर गांधी महाविद्यालय कडा येथील अर्थशास्र विभाग आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्रसंयोजक प्रा.डॉ.अशोक कोरडे यांची 5 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रा.डॉ.अशोक कोरडे हे गेल्या 24 वर्षापासुन गांधी महाविद्यालयात अर्थशास्र विषयाचे प्राध्यापक म्हणुन कार्य करत आहेत. त्यांनी आपल्या शैक्षणिक करियर मध्ये खूप मोठे कार्य केलेले आहे त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा विभाग, अर्थशास्र अभ्यास मंडळ सदस्य, विद्यापीठाच्या विविध समित्या, परीक्षा विभाग तसेच राष्ट्रीय मराठी अर्थशास्र परिषद, महाराष्ट्र अर्थशास्र परिषद, मराठवाडा अर्थशास्र परिषदेचे आजीवन सदस्य म्हणुन कार्य ते करत आहेत. त्यांनी अर्थशास्र विषयाचे मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय विद्यापीठ स्तरावर विविध संशोधन लेख, तसेच संदर्भ पुस्तकांचे लेखन आणि वाचन केले आहे, ग्रामीण उद्योगाच्या उभारणीसाठी उद्योजक आणि ग्राहक यांची कार्यक्षमता वाढणेसाठी तांत्रिक साधणे या विषयावर भारत सरकारचे पेटंट 2023 मध्ये डॉ.अशोक कोरडे यांना प्रदान करण्यात आलेले आहे, त्याबद्दल केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ.भागवत कराड यांनी त्यांचा सत्कार करून केलेल्या कार्याचा गौरव केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपालनियुक्त व्यवस्थापन सदस्य डॉ.गजानन सानप सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ विकास मंचाचे बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही ते कार्य करत आहेत. त्यांच्या परीक्षा मंडळावर निवडीबद्दल श्री.अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.योगेश भंडारी, सेक्रेटरी मा.हेमंत पोखरणा, कार्याध्यक्ष मा.कांतीलालजी चानोदिया, ट्रस्टी अध्यक्ष मा.गोकुळदासजी मेहेर, डॉ.उमेश गांधी, मा.अनिल झाडमुथ्था तसेच विद्यापीठ विकास मंचाचे निमंत्रक डॉ.सतीष पाटील, डॉ.कालिदास भांगे, प्राचार्य डॉ.हरिदास विधाते, डॉ.सचिन कंदले, डॉ.संजय पवार, प्राचार्य डॉ.प्रशांत चौधरी, डॉ.उमेश मुंढे, प्राचार्य डॉ.नवनाथ आघाव, डॉ.हरी जमाले, डॉ.शंकर आंभोरे, डॉ.पुरुषोत्तम देशमुख, डॉ, दिलीप मिसाळ, प्राचार्य डॉ.नंदकुमार राठी, उपप्राचार्य डॉ.ज.मो.भंडारी, प्रा.नवनाथ पडोळे, डॉ.राधाकृष्ण जोशी, डॉ.सुनील पंढरे, डॉ.तुकाराम गोंदकर, डॉ.चंद्रशेखर तळेकर, डॉ.शिवराज पातळे, डॉ.सुदाम जाधव, डॉ.विशाल वैद्य, श्री.मोहसीन सर, डॉ.युनुस सय्यद, डॉ.जमीर सय्यद, डॉ.श्रीकांत मगर, डॉ.सुपर्णा देशमुख, डॉ.अरुणा कुळकर्णी, डॉ.रमेश आबदार,डॉ.धनश्री मुनोत, डॉ.शिवाजी जगदाळे, डॉ. नरेंद्र गवळी, प्रा.सोमनाथ हासे, डॉ.नवनाथ कराळे, डॉ.उद्धव चव्हाण, डॉ.योगेश रसाळ, डॉ.मिरा नाथ, डॉ.राजकुमार थोरवे, प्रा.सुनिता बोंबे, डॉ.विष्णु गव्हाणे, डॉ.पांडुरंग अनारसे, डॉ.अनिल गर्जे, डॉ.आशिषकुमार कटारिया,प्रा.जाधव,प्रा,तोरडमल, श्री.ज्ञानेश्वर खंदारे तसेच विद्यापीठ आणि विविध स्तरावरील प्राध्यापक मित्रपरिवार यांनी त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले. विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मित्रपरिवाराकडून त्याचे स्वागत होत आहे.



stay connected