श्रीमती अरुणाताई वसंतराव पवार- राऊत यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न !
---------------------------------------
आष्टी /प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडा नं.१ मधील शाळेच्या शिक्षीका श्रीमती अरुणा पवार यांनी या शाळेमध्ये तब्बल २१ वर्ष
सेवा केली.
पुढे बोलताना अरुणाताई पवार म्हणाल्या की,बालपणी माझी परिस्थिती अत्यंत हालाखीची होती.
आम्ही सात बहीण भाऊ शिक्षणासाठी मला माझ्या आजोबांचे खूप चांगले मार्गदर्शन लाभले.माझे आजोबा मला नेहमी म्हणत गरीबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजु नये हे ब्रीद वाक्य मला माझे आजोबा नेहमी सांगत.
माझ्या आईचे शिक्षण अकरावी पर्यंत झाले होते.
माझे वडील व माझ्या आईची मी शिक्षक व्हावी ही खुप इच्छा होती आणि मग मी डी एड केले.त्यानंतर मी पहील्यांदाच नेवासा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षीका म्हणून कार्यरत होते.नंतर जामखेड,बीड,केरुळ,कडा अशा अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा केली आणि विद्यार्थी सुद्धा घडवले.
मी ३६ वर्ष सेवा केली आणि कडा येथे २१ वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली.विद्यार्थी माझे दैवत आहे आणि शाळा हीच माझे मंदीर आहे आणि प्रामाणिकपणाने मी ३६ वर्ष सेवा केली त्याचे हे फळ आहे असे म्हणत भावनिक झाले.व आलेल्या प्रमुख मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कड्याचे सरपंच सौ.लताबाई भिमराव पाटील, प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव,शिक्षण विस्तार अधिकारी मनोरंजन धस,उपसरपंच पत्नी जयश्री बाळासाहेब कर्डीले,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश तात्या कर्डीले, सुनिल सुर्यवंशी, अनिल ढोबळे,बा.म.पवार सर,सिद्धेश्वर शेंडगे, पत्रकार राजेश राऊत,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी सुधाकर यादव,मनोरंजन धस,टकले सर, अनिल ढोबळे,बा म पवार,बडे सर, बाळासाहेब महाडीक, विशाल पवार, सरपंच सौ.लताबाई पाटील,श्रीमती झांजे मॅडम आदींची भाषणे झाली.
या कार्यक्रमाला,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महादेव टकले,अर्जुन पाचारणे सर, सुभाष भादवे सर, पत्रकार रहेमान सय्यद, बाळासाहेब महाडीक, बाळासाहेब सेंदूरकर सर,माजी विद्यार्थ्यांसह महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दगडे सर व गिर्हे सरांनी केले.तर आभार सरडे सर यांनी मानले.


stay connected