*वाबळेवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..*
सात्रळ-(वार्ताहर )राहुरी तालुक्यातील वाबळेवाडी येथील जि.प.प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला..
याप्रसंगी विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलन केले.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते रिबीन फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेचे संचालक मा.विटनोर सर,वरशिंदे वाबळेवाडीच्या सरपंच मा.सौ कमलबाई गभाले, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री मोहन वाबळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद वाबळे,चिंचाळे शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक गोडे सर ,चांगदेव काकडे सर, विठ्ठल काकडे,श्री.रुपनर सर,रविकिरण साळवे, प्रकाश मांडगे, पाटीलबा गडधे,जाधव सर,ठाणगे सर,शिंदे सर ,लाटे सर,भांड सर, ग्रामपंचायत सदस्या अर्चना वाबळे आदि मान्यवर तसेच परिसरातील जेष्ठ ,श्रेष्ठ ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
विशेष बाब म्हणजे वाबळेवाडी येथील शिक्षक आणि ग्रामस्थ यांनी भैरवनाथ यात्रेनिमित्त गावात कुठला इतर कार्यक्रम आयोजित न करता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी,या लहान मुलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सासवडे सर,ठुबे सर, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटोळे सर,लहांगे सर,वर्पे सर,श्रीम.तांबे मॅडम श्रीम.वर्पे मॅडम आदिनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक तुषार ठुबे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सासवडे सरांनी मानले..


stay connected