वृक्षतोड आष्टी तालुक्यात मात्र; विक्रीचा प्रवास अहमदनगर जिल्ह्यात!

 *वृक्षतोड आष्टी तालुक्यात मात्र; विक्रीचा प्रवास अहमदनगर जिल्ह्यात!*

------------------------------------

टेम्पो,ट्रकच्या माध्यमातून दिवसरात्र होतेय वाहतूक 



आष्टी/ प्रतिनिधी

झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम दरवर्षी राबवुन शासन कोट्यावधी रूपये खर्च करते.नवी झाडे लावली जात असताना जुन्याचा मात्र जिव घेतला जातो.मशिनच्या साह्याने राजरोस वृक्षतोड आष्टी तालुक्यात तर विक्रीचा प्रवास अहमदनगर जिल्ह्यात होत असताना देखील याकडे संबंधित विभागासह सामाजिक संघटनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे.




   

आष्टी तालुक्यातील अनेक गावात सध्या शेतातील पिके निघु लागल्याने बाधावरील व शेत परिसरातील मोठमोठी झाडे वनविभागाची कसलीच परवानगी न घेता टेम्पो,टॅक्टर मध्ये मशिन घेऊन अनेक वर्ष जगवलेले झाड तासांत भुईसपाट करून व्यापारी विक्रीसाठी साठा करून ठेवत आहेत. पर्यावरणाचे कसलेच देणेघेणे नसल्याने आर्थिक माया कमवण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड आष्टी तालुक्यात करून त्यांची विक्री शेजारील अहमदनगर जिल्ह्यात केली जात आहे. याच्यावर कारवाई करून होणारी  वृक्षतोड थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक जाधव यांनी केली आहे.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.