साबलखेड ते अहमदनगर रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार
धानोरा , चिचोंडी येथील रस्ता मोकळा श्वास घेणार
केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी आष्टी साबलखेड नंतर आता साबलखेड ते अहमदनगर या ६७० कोटी खर्चाच्या नवीन रस्त्याच्या कामाला मंजुरी दिल्याने आष्टी ते अहमदनगर प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी आणि अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्यामुळे चिंचपूर ते आष्टी हा रस्ता झाला होता . आता त्यात साबलखेड ते अहमदनगर असा नवीन रस्ता तयार करण्याच्या कामास केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. अहमदनगर येथे सोमवारी अहमदनगर मिरजगाव करमाळा या चौपदरी रस्त्याचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध घोषणा करताना गडकरी यांनी अहमदनगर ते साबलखेड या रस्त्याच्या कामाची घोषणा केली त्यामुळे आष्टी ते अहमदनगर हा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. आष्टी ते साबलखेड या रस्त्याचे काम चालू असून लवकरच साबलखेड ते अहमदनगर असे काम सुरू होईल. त्यामुळे धानोरा येथील वाहतूक कोंडी सुटेल आणि संपूर्ण रस्ता अधिक रुंद होऊन जामखेड ते अहमदनगर हा प्रवास सुखद आणि सुलभ होईल केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमदार सुरेश धस आणि आमदार बाळासाहेब आजबे यांनी मागणी केल्याने आष्टी साबलखेड रस्त्याचे काम मंजूर झाले होते. आता खासदार डॉ सुजय विखे यांच्यामुळे पुढील रस्ता चांगला होणार आहे त्यामुळे नितीन गडकरी यांनी डॉ सुजय विखे यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.


stay connected