भाजपा ने लोकांना भावनीक करुन कीतीही ईव्हेंट केले तरी लोक बेरोजगारी,महागाई,महिलांवरील अत्याचार,शेतीमालाला नसलेले भाव विसरनार नाहीत-प्रदिप थोरवे
आम आदमी पक्षाची राज्यभरात जोरदार संघटनबांधणी सुरू आहे याच अनुषंगाने बीड येथे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख रंगा (दादा), युवक प्रदेश संघटन मंत्री प्रदिप थोरवे, बीड जिल्हाअध्यक्ष अशोकराव येडे यांच्या ऊपस्थीतीत मेळावा पार पडला. यावेळी प्रदिप थोरवे कार्यकरत्यांना संबोधीत करत होते. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीचे उद्दिष्ट लोकशाही वाचवणे व भाजपची हुकुमशाही संपवने हेच असेल. भाजपा ला सध्या त्यांनी काय विकास केला हे सांगायला नसल्यामुळे ते लोकांना भावनीक करुन राम मंदीर सारखे ईव्हेंट करत आहेत. जेनेकरुन लोक बेराजगारी,महागाई,महीलांवरील मनीपुरसाख्या ठीकानी झालेले अत्याचार,शेतीमालाला नसलेले भाव, हे सगळे मुद्दे विसरुन लोक पुन्हा भाजपा ला मतदान करतील हा त्यांचा भ्रम आहे. जर येनार्या काळामधे ईडीया आघाडी एकसंघ राहीली तर मोदिंना हरवने जास्त अवघडही नाही.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणी पक्षाचे अध्यक्ष अरविंदजी केजरीवालांचे स्वप्न "मेक ईंडीया नं वन" करन्यासाठी सर्व कार्यकरत्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतीमधुन होनार्या विकासकमांवर अंकुश ठेवावा. बोगस बिले ऊचलन्यास विरोध करावा. कारण गावचा विकास हा महत्वाचा आहे. गाव नं वन झाले तरच हा देश नं वन होईल.
गावागावांत सुरु असलेली जलजीवन मीशन योजना असेल, कींवा 15 वा वित्त आयोग अंतरर्गत आपल्या ग्रामपंचायतला कीती नीधी आला व कसा खर्च करण्यात आला, कुठे खर्च केला पाहीजे, गावातील/वस्तीवरील रस्ते याबाबत आपन वेळोवेळी सरपंच, ग्रामसेवक यांना विचारना केली पाहीजे.गावांनमधील शासकीय दवाखाने,शाळा,पाणी, वीज यांसारख्या प्रश्न सोडवन्यासाठी आपले कार्यकर्ते सगळ्यात पुढे असले पाहीजे, तरच आपला पक्ष घराघरांत पोहचेल.
आपला पक्ष देशात तिन नंबर ला आहे, जेव्हा दोन नंबर ला येईल तेव्हा मोदिंना पर्याय अरवींद केजरीवाल असतील म्हनुन केजरीवालांना चुक नसताना जेल मधे पाठवन्याची ईडी मार्फत भाजप घाई करत आहे
येणार्या काळामधे आपला पक्ष महाराष्ट्रामधे लोकसभा,विधानसभा,नगरपालीका, जिल्हापरीषद, पंचायत समीती अशा सगळ्या निवडनुका लढवेल त्या दु्ष्टीने सर्व पधीकारी आणी कार्यकर्ते यांनी आपआपल्या प्रभागात तयारी करणे गरजेच आहे. यावेळी बीड जिल्हा आम आदमी पार्टी च्या वतीने, जि.अध्यक्ष अशोक येडे,सचीव रामधान जमाले, ऊपजिल्हाअध्यक्ष रमेश गुट्टे, मराठवाडा संघटक सुग्रीव मुंडे,बीड संघटक आण्णा राऊत, डॅा.महेश नाथ,शि.का.ता अ.जरांगे पाटील,स्वप्निल पोटे,पठान शकील,दिपक झाडे, शैलेश थोरवे, भिमराव कुटे व ईतर पदाधीकार्यांसमवेत प्रदिप थोरवे यांचा प्रदेश युवक संघटन मंत्री पदि निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.


stay connected