AHMEDNAGAR | नगर-मनमाड रोडवरील मोठ्या व्यवसायिक इमारतीला आग
: नगर - मनमाड रोडवरील साई मिडास या व्यवसायिक इमारतीतील वरच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला सकाळी आग लागली. महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने काही क्षणात ही आग विझवली. आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसून वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाल्याचे समजते.
नगर मनमाड रोडवरील साई मिडास (डौले हॉस्पिटल चौक) या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे दुकाने, दवाखाना तसेच फायनान्स कंपनीची कार्यालये आहेत. या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर एका फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूने सकाळच्या सुमारास थोडी आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. मात्र काही क्षणातच ही आग भडकली आणि आगीसोबत मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडू लागला. ही बाब स्थानिकांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवली. अग्निशमन विभागाने तात्काळ बंब दाखल झाला आणि पाण्याच्या फवाऱ्याने ही आग विझवण्यात यश आले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र इमारतीवरील काही फर्निचरचा भाग खाली कोसळला. यात आग लागलेल्या खालच्या मजल्यावर एक मॅटर्निटी हॉस्पिटल देखील होते यात हॉस्पिटलला कुठली आग लागली नसून वरून येणारा आगीचा धूर खालच्या मजल्यावर पसरल्याने हॉस्पिटल मधील रुग्ण तात्काळ बाहेर काढून इतर रुग्णालयात हलवण्यात आले यात रुग्णालयाची कुठलीही हानी झाली नाही.


stay connected