अहमदनगर येथे होणाऱ्या ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार सभेस उपस्थित रहावे- दादा विधाते

 अहमदनगर येथे होणाऱ्या ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार सभेस  उपस्थित रहावे-  दादा विधाते



********************

आष्टी ((प्रतिनिधी)

ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण होऊन ते धोक्यात आले आहे.

झुंडशाहीने राज्य शासनावर दबाव आणून धमक्या देऊन ओबीसी आरक्षणात मागच्या दाराने घुसण्याचे षडयंत्र सुरू आहे.त्यामुळे ओबीसीचे राजकीय अस्तित्व ओबीसींच्या लेकराबाळांचे शासकीय नोकऱ्यांमध्ये नोकरी मिळण्याचे मार्ग बंद होणार आहेत.ओबीसी भटके विमुक्त जाती-

जमाती व बहुजनांची नवी पिढी उध्वस्त होणार आहे म्हणून ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी आपल्या नव्या पिढीच्या भवितव्यासाठी  आपल्यावर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध न्यायालयाच्या म्हणण्यानुसार जमेल त्या पद्धतीने प्रचंड संख्येने हरकती नोंदवा व राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी अहमदनगर येथील ३ फेब्रुवारी रोजी ओबीसी भटके विमुक्त महाएल्गार सभेसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दादा विधाते यांनी केले आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.