AMRAVATI | अमरावतीत पार पडला मूकनायक पुरस्कार सन्मान सोहळा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायक या वर्तमानपत्राला 104 वर्षे पूर्ण झाल्याने अमरावतीमध्ये पहिल्यांदाच मूकनायक पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळचे समूह संपादक राहुल गडपाले यांना राज्यस्तरावरील मूकनायक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर स्थानिक मंडळ वृत्तपत्राचे मुख्य संपादक अनिल अग्रवाल यांना विभागीय स्तरावरील मूकनायक पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुण्यनगरी मधील उपसंपादक पदावर कार्यरत महेश कथलकर, लोकमत समाचार मधील उपसंपादक नासिर हूसेन, ‘एबीपी माझा’चे जिल्हा प्रतिनिधी प्रणय निर्बान, विदर्भ मतदार मधील महिला पत्रकार योगिनी अर्डक यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ मतदारचे मुख्य संपादक दिलीप एडतकर, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रमिक पत्रकार संघाचे सचिव रविंद्र लाखोडे हे होते. शहरातील भीम टेकडी परिसरातील संबोधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.


stay connected