साबलखेड - कडा -आष्टी रस्त्याचे काम जलद गतीने करावे अन्यथा हाॕटेल चालक,व्यापाऱ्यांचा मंगळवारी रास्ता रोकोचा ईशारा

 *साबलखेड - कडा -आष्टी रस्त्याचे काम जलद गतीने करावे अन्यथा हाॕटेल चालक,व्यापाऱ्यांचा मंगळवारी रास्ता रोकोचा ईशारा*



कडा ( अनिल मोरे )

 आष्टी तालुक्यातील साबलखेड - कडा - आष्टी  या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे अन्यथा 

कडा परिसरातील व्यापारी ,हाॕटेल चालक,व्यावसायिक यांनी रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

       बीड  - नगर मार्गावरील आष्टी ते साबलखेड या रस्त्याचे काम सुरू आहे.हे काम अत्यंत धीम्या गतीने आणि कुठले नियोजन नसलेले काम सुरु आहे. या रस्त्यावर वाहन

चालवणे मोठे कसरतीचे ठरत आहे.पूर्ण मार्गावर सर्वत्र खोदून ठेवल्याने जामखेड ते नगर या मार्गावरील वाहनचालक या रस्त्याऐवजी जामखेड मिरजगाव नगर असा प्रवास करत आहेत.कडा परिसरातील गावातील

नागरिक देखील या रस्त्याने प्रवास करणे टाळत आहेत.त्याचा परिणाम कडा येथील बाजारपेठेवर झाला आहे.

येथील व्यापाऱ्यांची दुकानेच काय पण नगर बीड रस्त्यावरील हॉटेल व्यवसाय देखील अडचणीत आला आहे.

त्यामुळे या रस्त्याचे काम कंत्राटदार नक्की किती कालावधीत पूर्ण करणार हे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी घोषित करावे आणि त्या कालावधीत हे काम वेगाने करणार असल्याचे आश्वासन द्यावे अन्यथा कडा येथे सर्व व्यापारी, हॉटेल व इतर व्यावसायिक मंगळवार दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी रास्ता रोको आंदोलन करतील असा ईशारा व्यापारी व हाॕटेल चालकांनी निवेदनाव्दारे दिला आहे.या अशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.