पिडित कुटुंबांना तात्काळ मदत देऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी - भिम आर्मी ची मागणी

 पिडित कुटुंबांना तात्काळ मदत देऊन  आरोपींवर कठोर कारवाई करावी - भिम आर्मी ची मागणी




लातुर प्रतिनिधी:-लक्ष्मण कांबळे


 लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात वलांडी या गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली, एका नराधमाने सात वर्षाच्या लहान मुली वरती अत्याचार केल्याची घटना समजताच भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे हे लातूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी वलांडीत पोहोचले त्यांच्यासोबत मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे, लातूर जिल्हा अध्यक्ष विलास अण्णा चक्रे, मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अविनाश समिंदर(रावण), लातूर तालुका अध्यक्ष बप्पा घनगावकर हे उपस्थित होते

 यावेळी समाज कल्याण चे आयुक्त चिकुर्ते साहेब, पीडित कुटुंबाचे नातेवाईक, वलांडी गावचे सरपंच यांची भेट घेतली, पीडित कुटुंबाला शासनाकडून भेटणारी  आर्थिक मदत उद्याच्या तारखेत द्यावी अशी विनंती करण्यात आली, पीडित मुली बरोबरच तिच्या सर्व भाऊ आणि बहिणीची शिक्षणाची जबाबदारी ही शासनाने घ्यावी, मुलीच्या आईला सरकारी नोकरीमध्ये रुजू करून घ्यावे, समाज कल्याण तर्फे त्यांना पक्के घर मिळावे अशी विनंती भीम आर्मीच्या वतीने समाज कल्याणचे आयुक्त यांना करण्यात आली

 ही मदत लवकरात लवकर जाहीर करावी अन्यथा भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला

त्या हरामखोर आरोपींवर कठोर कार्यवाही व्हावी यासाठी भिम आर्मी पाठपुरावा करेल...








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.