NASHIK | MIDC चुंचाळे पोलीसांनी सराईत मोटार सायकल चोरट्यास केली अटक : 212000 रू किंमतीच्या सहा मोटार सायकल जप्त

 NASHIK | MIDC चुंचाळे पोलीसांनी सराईत मोटार सायकल चोरट्यास केली अटक : 212000 रू किंमतीच्या सहा मोटार सायकल जप्त



अंबड औद्योगिक वसाहत, म्हाडा, दत्तनगर, घरकुल परिसरातुन मोठ्या प्रमाणात मोटार सायकलींची चोरी झाली होती. सदर चोरांचा शोध घेवून मोटार सायकलीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान एमआयडीसी पोलीसांसमोर होते. पोलीस नाईक १३६३/समाधान चव्हाण यांना मोटार सायकल चोर हा वरचे चुंचाळे, दत्तनगर परिसरात आला असल्याबाबत गोपनीय माहिती विश्वासु खबऱ्यामार्फत मिळाली.


सदर गोपनीय माहितीची शहानिशा करून त्यावर कारवाई करण्याकरिता प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदिप पवार, पोशि ढाकणे, कांदळकर, सोनवणे, जाधव, कु-हाडे, बिराजदार, खैरणार, यांना सुचना दिल्या. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पो.उ.नि. संदिप पवार व पथकाने वरचे चुंचाळे, दत्तनगर, अंबड येथील बुद्ध विहार याठिकाणी सापळा लावुन संशयित इसम नामे किरण राजु गांगुर्डे उर्फ काळ्या यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे पोलीस तपासाचे कौशल्य वापरून विचारपुस केली असता त्याने चुंचाळे, दत्तनगर, कारगिल चौक, म्हाडा व औदयोगीक वसाहतीत त्याच्या इतर साथीदारांसह मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातुन एकुण २,१२,०००रू किंमतीच्या सहा मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.पुढील तपास चालू आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.