JALNA : Manoj Jarange Patil आज मराठा समाज बांधवांसह मुंबईकडे रवाना
- मनोज जरांगे पाटील आज समाज बांधवांसह मोठ्या संख्येने मुंबईकडे निघणार आहेत. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त वडीगोद्री फाटा येथे लावण्यात आला आहे. होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, शीघ्र कृती दलाचे जवान असे सुमारे दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त रस्त्यात ठिकठिकाणी लावण्यात आला आहे. जरांगे पाटलांचा मुंबई दौरा शांततेत पार पडावा, या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून ठिकठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शिवाय ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर या पायी पद यात्रेवर राहणार आहे.
जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत पायी चालत जाणार असल्याचं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केल आहे. मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना सरकार इतकं निर्दयी कसं असू शकत? शेकडो माता माऊल्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं आणि हे सरकार उघड्या डोळ्यांनी बघत आहे. त्यामुळे मी रात्रीपासून व्यथीत झालो अस म्हणत जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले. आपले लेकरं मेले आहेत. आता ते आपल्यात नाहीत. मात्र, त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंआहे. त्यामुळं मी आता अंतरवालीतूनचं आमरण उपोषण करत पायी मुंबईकडे चालत जाणार आहे, असं जरांगे पाटलांनी म्हंटल आहे. या मोर्चादरम्यानही राज्य सरकारशी चर्चेचे दरवाजे खुले राहणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.


stay connected