MUMBAI | सरकार सातत्याने मराठा समाजाची फसवणूक करत आहे, हे कातडी बचाव धोरण सरकारचं आहे - सचिन सावंत

 MUMBAI | सरकार सातत्याने मराठा समाजाची फसवणूक करत आहे, हे कातडी बचाव धोरण सरकारचं आहे - सचिन सावंत

Tej Marathi


 सरकार सातत्याने मराठा समाजाची फसवणूक करत आहे. मराठवाड्यात सरकारला 32 हजार कुणबी नोंदी मिळाल्या आणि नंतर ही आकडेवारी 54 लाख 57 लाख आली कुठुन, याचा अर्थ हा आकड्यांमध्ये आधीच दोष आहे.

दुसरे म्हणजे अध्यादेश आणि अधिसूचना यात फरक आहे. जोपर्यंत अधिवेशन येत नाही तोपर्यंत तो कायदा समजला जातो. इथे त्यांनी फक्त मसुदा दिला आहे ज्यावर हरकती मागवल्या जातील, ज्या की फेब्रुवारीपर्यंत मागवले जातील. या सगळ्या प्रक्रियेत मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं वाटत नाही, असे कॉंग्रेस प्रवक्ते सचिन म्हणाले आहेत. 


सगेसोयरेंच्या बाबतील देखील शब्दच्छल दिसत आहे. हे मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक आहे. हा प्रकार गंभीर आहे, यात मतांचं राजकारण केलं जातंय, हे कातडी बचाव धोरण सरकारचं आहे, अशी टीका देखील सचिन सावंत यांनी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.