अखेर महत्त्वाकांक्षी शिम्पोरा ते खुंटेफळ साठवण तलाव थेट जलवाहिनी कामाची निविदा प्रसिद्ध..
********************************
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वचनपूर्ती;आ.सुरेश धस यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त..
*****************************
******************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील सतत दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या खुंटेफळ साठवण तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी शिम्पोरा ते खुंटेफळ साठवण तलाव या थेट जलवाहिनी कामाची निविदा सूचना प्रसिद्ध झाल्यामुळे अखेर या चर्चित आणि बहुप्रतीक्षेतील महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी या थेट जलवाहिनी कामाची निविदा प्रसिद्ध केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विषयी खुंटेफळ साठवण तलावाचे शिल्पकार आ.सुरेश धस यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे ..
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावाची थेट जलवाहिनी निविदा काढण्याची एक वर्षापूर्वी आष्टी रेल्वे स्थानक उदघाटन प्रसंगी घोषणा केली होती त्यांची एकच वर्षात वचन पूर्ती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.दुष्काळग्रस्त आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा असून आ. सुरेश धस यांच्या अथक प्रयत्नातून हा प्रकल्प साकार होणार आहे..या खुंटेफळ साठवण तलावामध्ये उजनी जलाशय शिम्पोरा ता.कर्जत जि. अहमदनगर येथून थेट खुंटेफळ साठवण तलाव ता.आष्टी जि.बीड या ठिकाणी थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यात येणार आहे या बी-1 टेंडर असलेल्या योजनेची सूचना प्रसिद्ध झाली असून यासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टी तालुक्यातील जनतेसाठी उपयुक्त असे अत्यंत मोलाचे कार्य केले असून अंतिम निविदेनंतर लवकरच या तलावाच्या कामाची सुरुवात करण्यात येणार आहे..
महाराष्ट्र शासनाने कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना क्र.३ टप्पा१ अशी ही योजना असून महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, मुख्य अभियंता जलसंधारण जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर,औरंगाबाद पाटबंधारे मंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत..नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र.२ वैजापूर मुख्यालय छत्रपती संभाजी नगर चे कार्यकारी अभियंता श्री कृष्णा घुगे यांनी या शिम्पोरा ते खुंटेफळ साठवण तलाव या थेट जलवाहिनी कामाची बी-1 निविदा प्रसिद्ध केली आहे..
दुष्काळी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची आशा आकांक्षा या कामाकडे केंद्रित झालेली असल्यामुळे.. ही योजना बहुप्रतिक्षित आणि बहु चर्चेतील होती..परंतु अखेरीस आ. सुरेश धस यांच्या अथक प्रयत्ना मुळे या कामास मूर्त स्वरूप येत असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे..तर आ.सुरेश धस यांनी विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे..
stay connected