DHULE | वाहन चालक धडकले उपविभागीय अधिकारी कार्यालयावर , हिट एण्ड रन कायदा रद्द करण्याच्या मागणी साठी मोर्चा
वाहन चालकावर अन्याय करणारा हिट अॅन्ड रन हा काळा कायदा रद्द करण्याच्या मागणी करिता आज २ जानेवारी रोजी शिरपूर तालुका ट्रक मालक युनियन, जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने शहरातील चोपडा जीन पासून मोर्चा बाजार चौकातून उपविभागीय कार्यालयावर विविध मागण्यां संदर्भात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला व उपविभागीय अधिकारी मार्फत शानाला निवेदन पाठविण्यात आले.
शासनाने रस्ते अपघात संदर्भात हिट अॅन्ड रन हा कठोर कायदा अमलात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अंतर्गत रस्ते अपघातात अनावधानाने कूणी दगावल्यास वाहन चालकाला १० वर्षाची शिक्षा व ७ लाखाचा दंड ठोठावण्यात येणार आहे. या अन्यायकारक कायद्या विरोधात वाहन चालकांनी राज्यव्यापी बंद पूकारलेला आहे. तालूका संघटनेने सूद्धा सदर बंद आंदोलनात सहभागी होत आज आपले सर्व प्रवासी मालवाहतूक खाजगी वाहने बंद ठेवत आंदोलनात सहभागी झाले.
हा कायदा अत्यंत कठोर असून जेमतेम मिळकतीवर कूटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब वाहन चालकांचे व त्यांच्या कूटूंबाचे जिवनच उध्वस्त करणारा आहे. या कायद्याचा फेरविचार करण्यात यावा याकरीता आज किशोर राजपूत यांचा मार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले मोर्चाचे नेतृत्व शिरपूर तालुका ट्रक मालक युनियन अध्यक्ष, जय संघर्ष ग्रुप, यांच्या प्रमुखांनी केले. यावेळी मोठ्या संख्येत वाहन चालक हजर होते.
stay connected