लोकसभेत शिर्डी मतदार संघातून उभे राहण्याची इच्छा - केंद्रीय मंत्री रामदास आठवले
: येणाऱ्या लोकसभेमध्ये शिर्डी मतदारसंघातून मला उभे राहण्याची इच्छा असून त्या मतदार संघातून मी चांगल्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज नंदुरबार येथे व्यक्त केला. लोकसभेत रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळायाला पाहिजे .2009 मध्ये शिर्डी मतदार संघातुन मी पराभूत झालो परंतु या वेळेस चांगल्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
2024 मध्ये भाजप 400 च्या वर जागा जिंकेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेत्तृत्वाखाली देश पुढे जात आहे. लोकांना न्याय देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. केंद्राच्या विविध योजना आज सर्वसामान्य जनतेपर्यंत खेडोपाडी पोहचल्या आहेत. म्हणून 2024 चा लोकसभेत भाजप 400 च्या वर जागा जिंकेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
stay connected