आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांची कोल्हापूर परिक्षेत्रात बदली

 आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांची कोल्हापूर परिक्षेत्रात बदली





आष्टी : प्रतिनिधी

आष्टी पोलीस स्टेशन येथील कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांची लोकसभा निवडणूक अनुषंगाने झालेल्या बदलांमध्ये कोल्हापूर परिक्षेत्रात बदली झाली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी हे तीन वर्षांपूर्वी आष्टी पोलीस स्टेशनला रुजू झाले होते. रुजू झाल्यानंतर त्यांनी अवघ्या काही दिवसातच आष्टी तालुक्यातील जनतेचा विश्वास संपादन करत गुन्हेगारीचा बिमोड केला. गुन्हेगारांमध्ये गोसावी यांची मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती. गोसावी यांनी तालुक्यातील वाळु, कत्तलखाना, विनापरवाना दारू यासारखे अवैध धंदे रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करून आष्टी पोलिसांची मान उंचावण्याचे काम केले.शंभर पेक्षा जास्त गुन्ह्यात बीड, अहमदनगर ,पुणे सातारा, सोलापूर    छ . संभाजी नगर मधुन फरार दरोडेखोर आटल्या ईश्वर भोसले व त्याच्या साथीदारांना पिस्टलसह सिनेस्टाइलने पकडून जेरबंद केले होते.  हा कुख्यात दरोडेखोर सपोनि भाऊसाहेब गोसावी यांनी गेल्या काही दिवसापूर्वी झडप घालून पकडला होता. त्यावेळेस गोसावी यांच्या हा प्रसंग जीवावर बेतला असतानाही त्यांनी मोठ्या शिफारतीने आष्टी पोलिसांच्या टीमसह आटल्या भोसले सारखा खतरनाक गुन्हेगार जेरबंद केला होता. याशिवाय विनापरवाना दारूवर धाडी टाकून कारवाया केल्या आहेत. तसेच राज्यामध्ये गाजलेल्या नागपूर येथील गांजा प्रकरणातील आरोपी आष्टी तालुक्यामध्ये पकडून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे गोसावी यांनी बजावली होती. तसेच गेल्या अनेक वर्षापासून कडा शहरांमध्ये बेशिस्त असणाऱ्या वाहतूक तेचा प्रश्नही त्यांनी सोडवला होता अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्याने आष्टी तालुक्यातील अनेकांनी त्यांना शुभेच्छा देऊन निरोप दिला आहे.











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.