तरुणांनी मैदानी खेळाद्वारे कौशल्य दाखवत प्राविण्य मिळवावे ------आमदार सुरेश धस

 तरुणांनी मैदानी खेळाद्वारे कौशल्य दाखवत प्राविण्य मिळवावे 
------आमदार सुरेश धस

*********************************

आष्टीत नमो चषक आष्टी प्रीमियर लीगचे आ.सुरेश धस यांच्या हस्ते शानदार उदघाटन

**********************************





********************************

आष्टी (प्रतिनिधी)

तरुणांनो मोबाईलचे फायदे तेवढेच तोटे पण आहेत.मोबाईलचा उपयुक्तते पुरताच वापर करा तरुण पिढी ही मैदानी खेळा ऐवजी मोबाईल मध्ये भरकटली जात आहे.तरूणाईने मैदानी खेळाची सवय लावून खेळाकडे आकर्षित होऊन आपले कौशल्य दाखवत प्राविण्य मिळवले पाहिजे असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले आहे.

 भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आष्टी तालुक्यातील खेळाडू आणि  क्रीडा रसिकांसाठी पर्वणी म्हणून आयोजित केलेल्या नमो चषक 2024 अंतर्गत आष्टी प्रीमियर लीगचे ॲड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाच्या मैदानावर आ.सुरेश धस यांच्या हस्ते शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर युवा नेते जयदत्त धस,ॲड.वाल्मीक निकाळजे, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबरावजी मस्के,

नगराध्यक्ष जिया बेग, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,गणेश शिंदे,आदिनाथ सानप, पोलीस निरीक्षक संतोष वखेतमाळस, संजय मेहेर,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, किशोर हंबर्डे, मुर्शदपुरचे सरपंच अशोक मुळे,प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे,यशवंत खंडागळे,नवीन कासवा,पाटोदा PPL चे जवाद भाई उपस्थित होते.

शुभारंभापूर्वी स्पर्धेत सहभागी ८ संघातील सर्व खेळाडूंनी आष्टी शहरातून देखील रॅली काढली

पुढे बोलताना आ.धस म्हणाले,या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंने आत्ता एकच काम करायचे आहे की आपण आपल्या मित्राला मोबाईल पासून दूर करत मैदानी खेळाकडे आकर्षित करून मैदानात येण्याची विनंती करायची जेणेकरून नक्कीच आपल्या तालुक्याला मैदानी खेळात चांगले दिवस येतील आणि राष्ट्रीय पातळीचे खेळाडू तयार होतील.प्रत्येक जण हा अभ्यासातून एम. पी. एस.सी.करण्याचा प्रयत्न करतो मात्र मैदानी  खेळाकडे देखील लक्ष देणे पण तेवढेच गरजेचे आहे,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे,खा.प्रीतमताई मुंडे,युवा मोर्चा अध्यक्ष राहुल लोणीकर,जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी आदेशीत करून हा नमो चषक आयोजित करण्याचे सांगितले.मी या सर्वांचे आभार मानतो की,एकदम सुंदर कार्यक्रम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा राबवित आहे.यातून नक्कीच मैदानी खेळा द्वारे नवनविन खेळाडूंना संधी मिळणार असून नवीन खेळाडू तयार होती ल असे आ.सुरेश धस यांनी शेवटी सांगितले.

पाहिल्यादिवशी पहिल्याच रोमहर्षक सामना रंगला होता.यामध्ये नवाब चॅम्पियन आणि धवलगिरी इंडियन्स यांच्यात सामना होऊन धवलगिरी इंडियन्सने दणदणीत विजय मिळावला.

यावेळी सचिन लोखंडे,बंडू शेठ तोडकर,अमोल शिंदे,इंजि. अत्तहर बेग,नगरसेवक सुरेश वारंगुळे,व्यवस्थापक जितेंद्र शिंदे,अरुण निकाळजे, दीपक निकाळजे,रिजवान शेख,सादिक कुरेशी, नगरसेवक अक्षय धोंडे,नगरसेवक इर्शान खान,कपिल अग्रवाल या स्पर्धेचे आयोजक नगरसेवक शरीफ शेख, नगरसेवक किशोर झरेकर,सतीश टकले

आदींसह व्यापारी,पत्रकार, यांच्यासह मान्यवर व परिसरातील खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.