कुंभेफळ सेवा सोसायटी आ.सुरेश धस यांच्या ताब्यात

 कुंभेफळ सेवा सोसायटी आ.सुरेश धस यांच्या
ताब्यात

**********************************

दत्तकृपा गावकरी पॅनलचा दणदणीत विजय

**********************************



*********************************

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील कुंभेफळ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आ.सुरेश धस व माजी आ.साहेबराव दरेकर यांच्या नेतृत्वाखाली दत्तकृपा गावकरी पॅनलचे 12 पैकी 12 जागेवर उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत.

आष्टी तालुक्यातील कुंभेफळ विविध सहकारी सेवा सोसायटी आमदार सुरेश धस व माजी आ.साहेबराव दरेकर यांच्या नेतृत्वाखाली दत्तकृपा पॅनलचा एकतर्फी दणदणीत विजय झाला आहे. विविध सहकारी सेवा सोसायटी निवडणूक निर्णय अधिकारी बी.जे.शिंदे व बी. एम. राऊत यांनी काम पाहिले.

या निवडणूकीत दत्तकृपा गावकरी पॅनल विरुद्ध स्वाभिमानी ग्रामविकास पॅनल अशी लढत होऊन दत्तकृपा गावकरी पॅनलचे 12 पैकी 12 संचालक बहुमताने विजयी झाले आहे. यामध्ये

नवनिर्वाचित संचालक मंडळातून कौशल्या मल्हारी गाडे, कुसुम नवनाथ जंजिरे,बाबासाहेब 

धर्मजी काकडे, पंढरीनाथ विश्वनाथ काकडे, लक्ष्मण रंगनाथ काकडे, हरिभाऊ भागूजी काकडे,अजिनाथ शिवाजी गाडे,शिवाजी एकनाथ जंजिरे,बाबासाहेब आप्पा मुठे,आकाश मोहन शिंदे हे विजयी झाले तर

कांचन दौलत मुठे व पन्ना आबा काळे हे बिनविरोध निवडून आले आहेत.या निवडीबद्दल त्यांचे आ.सुरेश धस,माजी आ.साहेबराव धस,युवा नेते जयदत्त धस,लोणी गटाचे नेते हनुमंत जंजिरे, यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.