आष्टी तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रविण पोकळे उपाध्यक्ष संतोष सानप
****************************
****************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुका पत्रकार संघाची नुकतीच बैठक जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे ,उत्तम बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.यावेळी
सर्वानुमते तालुकाध्यक्षपदी प्रजापत्रचे वार्ताहर प्रविण पोकळे,उपाध्यक्षपदी लोकाशाचे वार्ताहर संतोष सानप तर सचिवपदी सांज राजयोगचे वार्ताहर शरद रेडेकर यांची निवड करण्यात आली.आष्टी तालुका पत्रकार संघाची आष्टी येथे दर्पण दिनानिमित्त दि.६ रोजी पञकार भवन येथे संपन्न झाली.
या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.ही बैठक जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे ,उत्तम बोडखे,मावळते अध्यक्ष प्रा.डाॕ.विनोद ढोबळे ,रघूनाथ कर्डिले,
भीमराव गुरव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या बैठकीत सर्वानुमते पञकार
संघाच्या अध्यक्षपदी प्रविण पोकळे, उपाध्यक्षपदी संतोष सानप,सचिवपदी शरद रेडेकर यांची निवड करण्यात आली.यावेळी संतोष सानप,शरद तळेकर,उत्तम बोडखे,
प्रा.डाॕ.विनोद ढोबळे यांची भाषणे झाली. नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रविण पोकळे म्हणाले की,पत्रकारितेतील माझे वय कमी असुन देखील माझी अध्यक्षपदावर निवड केल्याबद्दल मी सर्व जेष्ठ ,कनिष्ठ पत्रकार बांधवांचा मनापासुन आभारी आहे.विधायक वा समाजोपयोगी उपक्रम आपण राबवु असे यावेळी आश्वासन दिले.या बैठकीस शरद तळेकर,गणेश दळवी, सचिन रानडे,मनोज पोकळे यांच्यासह आदी पञकार बांधव उपस्थित होते.
stay connected