टाकळी आमिया रस्त्यालगत अज्ञात वाहनाने मोटरसायकल चालकास धडक दिल्याने सतरा वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू.,

 टाकळी आमिया रस्त्यालगत अज्ञात वाहनाने मोटरसायकल चालकास धडक दिल्याने सतरा वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू.,



कडा/ प्रतिनिधी...



आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया रस्त्यावर मोटरसायकल क्र . MH14FFU 5101 व चार चाकी वाहनाचा समोरासमोर अपघात होऊन यामध्ये मोटरसायकल चालक युवक हा जागीच ठार झाल्याची घटना काल घडली.

सध्या कडा व टाकळी आमिया या शिवावरती बाळूमामा यांचे रावटी असून तेथे कीर्तन व भजनाचा कार्यक्रम आठ दिवसापासून सुरु आहे या कीर्तन व भोजनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येथे जात असतात हा युवक किर्तनासाठी जाताना दिंनाक 4 जानेवारी 2024 रोजी  8 ते 9 दरम्यान ही घटना घडली  महेश नागेश होळकर हा युवक आपल्या आईला सोडण्यासाठी गेला होता व आईला सोडून माघारी घराकडे येत असताना दुर्दैवी अपघात झाला या अपघातामध्ये महेश नागेश होळकर हा युवक जागीच ठार झाला

महेश नागेश होळकर हा17वर्षीय युवक  याला नातेवाईकांनी कडा येथील सांगळे हॉस्पिटल येथे आणले डॉक्टरांनी महेशला मृत्य घोषीत केले . प्राथमिक आरोग्य केंद्र कडा येथे शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर रात्री 12:30 वाजता कडा येथील स्मशानभुमीत अंत्य संस्कार करण्यात आले .


नागेश शंकर होळकर हे सुद्धा काही वर्षापुर्वी मयत झाले आहेत नागेश यांना एक मुलगा व एक मुलगी असुन मुलीचे दोन वर्षापुर्वी लग्न झाले असून महेश हा 11वी वर्गात शिक्षण घेत होता .

महेश हा अतिशय गुणी मुलगा होता महेश जाण्याने कडा शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.