हिवरा गावचे माजी सरपंच केशव चव्हाण यांना पितृशोक
आष्टी तालुक्यातील हिवरा गावचे माजी सरपंच केशव चव्हाण यांचे वडील कै.मुरलीधर महादू चव्हाण यांचे पुणे येथे हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी 29 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता हिवरा स्मशानभूमीत झाला.त्यांच्या जाण्याने चव्हाण परिवारावर व गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माजी सरपंच केशव चव्हाण यांचा नातेवाईक व मित्रपरिवार खूप मोठा आहे . कै मुरलीधर चव्हाण यांचा दशक्रिया विधी शनिवार दि . 6 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे याप्रसंगी हभप स्वप्नील पवार महाराज यांचे प्रवचन होईल .
दशक्रिया विधी शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता.हिवरा पिंपरखेड बंधाऱ्याजवळ होईल.
stay connected