अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जागीच ठार

*अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जागीच ठार*



कडा धामणगांव महामार्गावर घडला भिषण अपघात


आष्टी/ प्रतिनिधी

तालुक्यातील देविनिमगांव येथील मयत वसंत तुकाराम जवणे वय वर्षे 62 राहणार देविनिमगांव हे धामणगां येथून मोटार सायकलवरून देविनिमगांव गावी येत असताना गितेवाडी - देविनिमगांव शिवारातील मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृताचे शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक रुग्णालय कडा येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलिस नाईक अमोल ढवळे यांनी दिली आहे.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.