आगामी लोकसभा निवडणुकीत आता ‘आम आदमी पार्टी’ची उडी.. बीडची जागा ‘आप’ लढवणार- जिल्हा युवक ऊपाध्यक्ष प्रदिप थोरवे यांचा दावा

 आगामी लोकसभा निवडणुकीत आता ‘आम आदमी पार्टी’ची उडी..
बीडची जागा ‘आप’ लढवणार- जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रदिप थोरवे यांचा दावा



     आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत असलेला अरविंद केजरीवाल यांचा “आम आदमी पक्ष”बीड लोकसभेची जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आम आदमी पार्टी चे युवक प्रदेश अध्यक्ष मयुर दोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे आयोजीत केलेल्या युवक आघाडी पक्षाच्या बैठकीत बीड लोकसभेची जागेची मागणी प्रदिप थोरवे यांनी पक्षाकडे केली आहे. सध्या ही जागा राष्ट्रवादी पक्षाकडे होती. परंतु राष्ट्रवादी हा पक्ष फुटुन दादा गट सत्तेत असल्याने त्यासंदर्भात इंडिया आघाडीतील इतर पक्षाध्यक्ष शरद पावार गट, ऊद्धवजी ठाकरे व नाना पटोले यांच्याशी पक्षाने चर्चा करावी व आपनही बीड च्या ईंडीया आघाडीतील पक्षांध्यक्षांनकडे या या संदर्भात चर्चा करु. महाराष्ट्रातील इतर जागांवर इंडिया आघाडीतील पक्षांच्या उमेदवारांचे काम आपचे कार्यकर्ते करणार आहेत, तेव्हा आप पार्टी ला सुद्धा काही जागेंवर संधी मीळावी अशी आग्रही मागणी प्रदिप थोरवे यांनी केली आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे सरकार आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. असे सर्व जिल्यांतील ऊपस्थीत पदीधीकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करताना प्रदेश अध्यक्ष मयुर दौंडकर यांनी सांगितले.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.