स्वामी विवेकानंद शिक्षकांच्या पतसंस्थेवर आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा पॅनलचा पुन्हा वर्चस्व
*********************************
१७ पैकी १५ जागेवर संचालक विजयी
**********************************
Vdo news पहा - https://youtu.be/39DXWmeO-Qs?si=uG7kMNNvGe05DaYP
आष्टी (प्रतिनिधी)
शिक्षकांची कामधेनु पतसंस्था म्हणून समजली जाणारी आष्टी तालुक्यातील कडा येथील स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेवर आ.सुरेश धस समर्थकांच्या सदिच्छा पॅनलने १५ जागेवर विजय मिळवला तर आ. बाळासाहेब आजबे यांच्या पॅनलच्या २ जागेवर विजय मिळवला आहे १५ विरुद्ध २ असा निकाल समोर आला असून पुन्हा या संस्थेवर आ.सुरेश धस यांनी पुन्हा एकदा रक हाती वर्चस्व मिळवले आहे..
आष्टी तालुक्यातील महत्वाची समजली जाणा-या स्वामी विवेकानंद पतसंस्था पंचवार्षिक निवडणूकीसाठी एकुण १७ जागेसाठी ३४ उमेदवार रिंगणात उतरले होते. यात सदिच्छा पॅनल विरुद्ध एकता पॅनल अशी सरळ लढत झाली आहे.आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली समर्थकांचा सदिच्छा पॅनल तर विरोधी पॅनल बाळासाहेब आजबे यांच्या समर्थनाचा होता.रविवार दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ३ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली.एकूण ९८८ पैकी एक मत झाले आहेत ९८७ पैकी ९७७ शिक्षकांनी आपल्या मतदानाचा हक्क तर १० शिक्षकांनी मतदान केले नाही बजावला ९९ टक्के मतदान प्रक्रिया पार पडली होती. सायंकाळी सहा वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती.
या निवडीबद्दल सर्व नवनिर्वाचित संचालकांचे आमदार सुरेश धस यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या
चौकट
विजयी उमेदवार व मतदान
महेशकुमार शिंदे-५८४
विठ्ठल शिंदे-५३२
नितीन करडुळे-४९९
अप्पासाहेब काळे-५५७
संजय काळे-५५०
चंद्रशेखर खाडे-५०२
रत्नाकर चव्हाण-५८८
स्वानंद थोरवे-५८२
मारुती पठाडे-६०८
प्रवीण मेहकर-५७४
अशोक लटपटे-५४९
शैला सातपुते-४८९
मनिषा होळकर-५६३
गोरख गोरे-४९९
पोपट बोराडे-५०१
आदिनाथ गर्जे-५३८
हिरामन पोकळे-५२१
पराभूत उमेदवार व मतदान
संदीप औटे-३४७
साहेबा कोहोक-३८०
अशोक गाडे-३९८
उमेश झांबरे-४४८
शमीमबानो तांबोळी-२३६
प्रशांत दगडे-५५७
प्रमोद नरोटे-४८१
बाळासाहेब महाडिक-४२२
देविदास भवर-३०३
राऊसाहेब दाणी-४३७
कैलास शेकडे-३७२
सलीम शेख-४४२
लता ढोबळे-४७४
कौशल्या मांगडे-४१३
बाळू बनसोडे-४७४
सुर्वत गव्हाळे-४७१
रामभाऊ फुले-४३१


stay connected