आष्टी तालुक्यातील सुपूत्र प्रदिप थोरवे यांची “आप” च्या युवक महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री पदी निवड.

 आष्टी तालुक्यातील सुपूत्र प्रदिप थोरवे यांची “आप” च्या युवक महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री पदी निवड.



आष्टी/ प्रतिनिधी

आम आदमी पार्टीच्या वतीने आष्टी तालुक्यातील प्रदिप गणपतराव थोरवे यांची राज्य युवा आघाडीच्या प्रदेश संघटन मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.संदीप पाठक, महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंघला,राज्याचे सहप्रभारी गोपाल इटालीया,युवक प्रदेश अध्यक्ष मयुर दौडकर व प्रदेश सचीव प्राजक्ता देशमुख यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे प्रदिप थोरवे यांची राज्य युवा आघाडीच्या संघटन मंत्री पदी  नेमणूक केल्याची घोषणा केली आहे. थोरवे हे सध्या बीड जिल्हा युवक ऊपाअध्यक्ष म्हणून कार्य करत होते. या काळामध्ये त्यांनी बीड,अहमदनगर, ओंरंगाबाद सह पुणे जिल्ह्यांमध्ये युवकांचे संघटन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. शेतकर्यांचे प्रश्न, सुशिक्षीत बेरोजगार तरुणांनांचे प्रश्न, वैद्यकीय मदत, गोरगरीबांची प्रश्न सरकारी अधिकार्यांनकडुन करुन घेने सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी पक्षाच नाव नेहमीच मोठ करण्याचं काम केलं. देशात एकूण 2300 पेक्षा जास्त राजकीय पक्षांना मागे टाकुन देशात 3 नंबरचा राजकीय पक्ष बनलेल्या व जगात सर्वात वेगाने वाढणारा एकमेव पक्ष म्हनजेच आम आदमी पार्टी, आणी याच बलाढ्य पक्षाने त्यांना महाराष्ट्राच्या युवक प्रदेश संघटन मंत्री पदाची जबाबदारी दिली.येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील घराघरामध्ये पक्षाचे विचार पोहचवण्यासाठी तसेच युवकांना संघटीत करण्यासाठी ते निश्चित  मेहनत घेतील असा विश्वास राज्यभरातील युवकांकडुन व्यक्त होत आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.