पशुधन पालक करणार धानोरा येथे रस्ता रोको आंदोलन
धानोरा , चिंचोली , पुंडी तसेच परीसरामधे मागील बऱ्याच दिवसापासुन गाई, म्हशी ,बैल, शेळया चोरीला जाण्याचे सत्र सुरू आहे. याबाबत अंभोरा पोलीस ठाण्याला बऱ्याच वेळा तोंडी व लेखी स्वरूपाच्या तक्रारी दिलेल्या आहेत मात्र अद्याप पर्यंत कसलीही कार्यवाही झालेली नाही . या प्रकारामुळे संतप्त पशुपालक शेतकरी नगर बीड रोड वर धानोरा येथे मंगळवारी रस्ता रोको करणार आहेत .
पशुधन चोरी प्रकरणाचा शोध किंवा दखल अद्याप घेतलेली नाही त्यामुळे परिसरातील लोक अत्यंत भयभित झालेले आहेत व काहि लोकांवर जे शेतामधे एकटे वस्ती करून राहतात त्यांच्यावर घर सोडुन गावात जाऊन राहण्याची वेळ आलेली आहे. म्हणुन काही लोकांनी मिळून रात्रीचे जागे राहुन हे जनावरे चोरणारे लोक आहेत, याबाबत माहिती घेण्याचा व त्यांना पकडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला व त्या मधुन संशयास्पद लोकांची नावे काही ग्रामस्थांनी पोलीसांनाही सांगीतली परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही त्यानंतर चिंचोली येथील एका शेतकऱ्याच्या शेळया चोरी गेल्या त्याबाबत आम्ही तक्रार देण्यासाठी अंभोरा पोलीस स्टेशनला गेलोत त्या ठिकाणी कार्यरत असणारे बिटअमलदार तांदळे यांनी तक्रार घेतली नाही व तक्रार घेण्यास टाळाटाळ केली .आम्ही तुमच्या शेळयांचा शोध लावतो असे आश्वासन पोलीस देतात मात्र या परीसरामध्ये भरपुर जनावरांच्या चोऱ्या झालेल्या आहेत.
या बाबत कसल्यही प्रकारची चौकशी व तपास झाला नाही वेळोवेळी आम्ही पोलीसांना जनावरांच्या चोरांची माहीतीही दिली पण येथील कर्मचारी टाळाटाळ करत सदरील चोरांना पाठीशी घातले असुन संशयीत लोक व पोलीस प्रशासन यांचे आर्थीक हितसंबंध आहेत. त्यामुळे सदरील कर्मच्या-यांवर योग्य प्रकारे प्रशासकिय कार्यवाही करण्यात यावी त्या ठिकानी दुसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी या मागणीसाठी चिंचोली , पुंडी , हिवरा ,शिरापूर , बाळेवाडी , खुंटेफळ , धानोरा आदी गावच्या वतीने सर्व लोक दिनांक 19/12/2023 वार मंगळवार या दिवशी रस्ता रोको आंदोलन करणार आहोत असा ईशारा तहसिलदार आष्टी यांना दिलेल्या निवेदनातून देणात आला आहे . या निवेदनावर बापु रामदास इथापे, अजिनाथ धर्मा इथापे, पोपट बाबु एकशिंगे, सिताराम लहानु इथापे, सुदाम धोंडीबा कुटे, गंगाराम राजाराम कर्डिले, संतोष रामभाऊ होळकर, शिवाजी पगारे यांच्या स्वाक्षर्या आहेत .
stay connected