पंचक्रोशी प्रकाशनाच्या आयोजक सुनंदा कर्चे आणि बाळासो कर्चे यांच्या द्वारा संगीतकार तेजस्विनी ढमाळ यांचा सत्कार

 पंचक्रोशी प्रकाशनाच्या आयोजक सुनंदा  कर्चे आणि बाळासो कर्चे यांच्या द्वारा संगीतकार तेजस्विनी ढमाळ यांचा सत्कार



दिनांक 26 /11/ 2023 रोजी पंचक्रोशी प्रकाशन बारामती व कवयित्री रेश्मा गडकरी यांचे संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय काव्य संमेलन रेश्मा गडकरी लिखित हृदयातील स्पंदन या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला . यावेळी बासरी वादन कवयित्री, संगीतकार, तेजस्विनी ढमाळ मॅडम यांनी केले . त्यांच्या या बासरी वादनातून प्रसन्न असे वातावरण निर्माण होऊन कार्यक्रमाला नवा असा बहर आला . त्याचप्रमाणे संगीतकार सुवर्णा जमदाडे यांनी शारदा स्तवन केले . पाट्या पुस्तकातील कवयित्री अस्मिता जोगदंड या मान्यवर म्हणून उपस्थित होत्या . मनवा गायकवाड या चिमुकलीने शास्त्रीय नृत्य सादर केले कार्यक्रमांमध्ये अनेक कवी कवयित्री यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली यापैकी शोभा बाबर, उज्वला कुंभार, दामिनी ठिगळे, वनिता भुतकर, रत्नमाला लोंढे, भक्ती केंजळे यांनी उत्कृष्ट अशा कविता सादर केल्या . सूत्रसंचालन शुभांगी जाधव यांनी उत्कृष्ट असे केले . 

    कु. तेजस्विनी  मॅडमचे सर्व स्तरातून कौतुक होऊन त्यांचे अभिनंदन होत आहे .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.