मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीला जरांगे मुंबईत उपोषणास बसणार ; ३ कोटी मराठे उपोषणाला भेट देण्यासाठी जाणार !

मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीला जरांगे मुंबईत उपोषणास बसणार ; ३ कोटी मराठे उपोषणाला भेट देण्यासाठी जाणार !

Manoj Jarange Live






 राज्य सरकार वेळ काढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करतंय, आम्हाला सुद्धा मर्यादा आहे, आम्ही तरी किती दिवस दम काढणार? मराठ्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. आपण फक्त लढायचं नाही तर जिंकायचं सुद्धा आहे असं मनोज जरांगे पाटील बीड येथील निर्णायक इशारा सभेत म्हणाले. त्यामुळे अंतरवाली सराटीनंतर आता मुंबईत धडकायचं आहे असं म्हणत 20 जानेवारीपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. बीड येथे सुरू असलेल्या जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली, सरकार मराठा समाजाचा अपमान करत आहे पण आम्ही 100 टक्के आरक्षण घेऊनच दाखवू, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही मी मेलो तरी चालेल पण मुंबई सोडणार नाही, 20 जानेवारीला समाजाने शांततेत मुंबईत यायचं आहे, पोलिसांना त्रास द्यायचा नाही, जो कुणी हिंसा करेल तो समाजाचा नसेल, आरक्षणाचा हा शेवटचा टप्पा आहे ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवू, अनुचित प्रकार जो करेल त्याला तातडीने पोलिसांच्या ताब्यात द्या सरकारने आता तरी शहाणपण दाखवावे, मराठे शांत आहेत त्यांना शांततेत राहू द्या आता आरक्षणाचा निर्धारच केला आहे असे सांगून त्यांनी पुढचा इशारा दिला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.