चिंचाळा येथे वीज पडून गायीचा मृत्यू
----------------------------------------
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथे सोमवार दि.27 रोजी संध्याकाळी साडेनऊ च्या सुमारास विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. चिंचाळा येथील शेतकरी संदिप रावसाहेब पोकळे यांची गाय अंगावर वीज पडून दगावली आहे. आष्टी तालुक्यात साधारण एक तासभर भाग बदलत विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडत झाला दरम्यान चिंचाळा व देसुर गावात ही विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस चिंचाळा गावातील शेतकरी संदिप रावसाहेब पोकळे यांच्या मुक्त गाय गोठ्यात वीज पडून त्यात त्यांची एक गाय दगावली. आज दि .28 रोजी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे, यावेळी सरपंच पंडित पोकळे व डॉ अशोक पोकळे, इतर पंच व गावातील शेतकरी उपस्थित होते.
stay connected