सुरेश पाटोळे यांची सरपंचपदी निवड होणार..

 सुरेश पाटोळे यांची सरपंचपदी निवड होणार..?



पाटोदा (प्रतिनिधी)

     मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक शिव संघर्ष ग्रुपचे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटोळे यांची वहाली ग्रामपंचायत सरपंच पदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. असा गावकऱ्यांचा अंदाज असून त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून घरोघरी त्यांच्याच नावाची चर्चा होतांना दिसत आहे. 

     सुरेश पाटोळे यांनी निवडणूक जाहीर होताच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे गावातील नागरिकांना सांगितले परंतु मराठा आरक्षणाचे कसलेच सोयर सुतक नसलेले गद्दार श्रीमंत मराठा बांधव यांनी गावकऱ्यांना न जुमानता आणि मागील केलेला भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून स्वतः आणि ज्यांच्या विरोधात गेली चाळीस वर्षे विरोधी भूमिका घेतली. त्यांना समर्थन देवून निवडणूकीत उभा करून स्वतः अलिप्त राहून आमचे ऐकत नाहीत असे सांगत मराठा आरक्षणामुळे माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला असे खोटे आणि निर्थक उत्तरे देताना गावात मिरवतात. दुसरे पॅनल वाले तर स्वतःच्या आजोबांच्या नावाने गावकऱ्यांना मते मागताना दिसतात. पराभव झाल्यावर अख्या गावाला आइमाईवर शिवीगाळ करणारे, गावात दिसेल त्यांना वेळोवेळी खोटे बोलणारे मुंबई पासुन वहाली गावापर्यंत लबाडी करून स्वतःचे अस्तीत्व किती महत्वाचे आहे शेंबड्या पोरांना दारू व मटण चारून माझाच भाऊ कसा निवडून येईल याची बढाई मारताना दिसत आहे. 

     ज्यांना आरक्षणाची गरज नाही असे दोन श्रीमंत मराठा उमेदवारसह पॅनल आणि एका बाजूला स्वतः चे दुःख लपवून गरीब व कष्टाळू लोकांसाठी अहोरात्र झटणारे, त्यांचे दुःखाश्रू पुसणारे सामजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे आहेत. म्हणून त्यांना गावकत्यांचा पाठींबा वाढतांना दिसत आहे. त्यामुळे श्रीमंत मराठा विरुद्ध गरीब मराठा समर्थक सुरेश पाटोळे यांचे या निवडणूकीत पारडे जड होतांना दिसत असून त्यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरेश पाटोळे यांची सरपंच पदी निवड निश्चित मानली जाते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.