*डॉ. अरविंद तांबारे यांचा वाढदिवस नवजीवन संगोपन केंद्र आष्टी येथील गोर गरीब मुलांना मदत करून साजरा*
==============================================
*जामखेड तालुक्यातील भोरवाडी येथील सुप्रसिध्द पशुवैद्यकीय डॉ.अरविंद तांबारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नवजीवन संगोपन केंद्र आष्टी येथील अनाथ, निराधार,गोरगरीब,वंचित दुर्बल घटकातील मुलांना दिवाळी फराळ साठी मदत करून आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रमाने अन्न दान करून साजरा करण्यात आला.*
*सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे तसेच आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून डॉ.अरविंद तांबारे यांनी इतर अनाव्यशक गोष्टी टाळून गरजू मुलांना मदत करून आपला वाढदिवस साजरा केला.*
*यावेळी डॉ. तांबारे म्हणाले की माझ्याकडून फूल नाही फुलाची पाकळी मदत म्हणून मी माझा वाढदिवस येथील मुलांसाठी दिवाळी फराळ देऊन साजरा केला.येणाऱ्या काळात नवजीवन संगोपन केंद्रास कोणतीही अडचण आल्यास आम्ही जे शक्य होईल अशी मदत करून सहकार्य करू*
*या कार्यक्रमाच्या शेवटी नवजीवन संगोपन केंद्र आष्टी चे संस्थापक अध्यक्ष विकास म्हस्के मेजर यांनी डॉ.अरविंद तांबारे हे मुक्या प्राण्यांची मनोभावे सेवा करतात.तसेच त्यांचे कार्य खूप छान आहे.बोलता येत नसलेल्या प्राण्यांची सेवा करणे हे फार अवघड काम डॉ .साहेब करतात याबद्दल नवजीवन संगोपन केंद्राच्या वतीने त्यांचा सन्मान करून त्यांना वाढदिवसाच्या शुभे्छा देऊन उपस्थित सर्वांचे आभार मानले*
stay connected