आ.सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश आले कुकडी प्रकल्पाचे पाणी सीना धरणासाठी सोडणे सुरू झाले.
********************
३ ऑक्टोबर पर्यंत सीना मध्ये पोहोचणार..
************************
आष्टी ( प्रतिनिधी )
कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेले येडगाव, माणिकडोह, वडज, आणि पिंपळगाव जोगे ही धरणे पूर्ण भरली होती आणि डिंभे हे धरण देखील गेल्या काही दिवसातील पाण्याने भरल्यामुळे ओव्हर फ्लो होणारे पाणी मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी मिळणे शक्य झाले असल्याने कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लो मुळे अतिरिक्त होणारे आणि सीना प्रकल्पासाठी आणि नंतर त्यातून ते पुढे आष्टी तालुक्यातील मेहेकरी धरणांमध्ये सोडण्यात यावे अशी मागणी आ. सुरेश धस यांनी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा
पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडे केली असता त्यांनी याबाबत तात्काळ कारवाईचे आदेश दिल्यामुळे कुकडी धरणांमधील अतिरिक्त पाणी सीना प्रकल्पासाठी सोडण्यास सुरुवात झाली असून आष्टी तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील अपुरा पाणीसाठा लक्षात घेता, कुकडी प्रकल्पातून अति प्रवाहित होणारे १.२ टी. एम.सी.पाणी सीना मेहकरी उपसा सिंचन योजने अंतर्गत..रब्बी पिका साठी असलेले हक्काचे पाणी सीना प्रकल्पात सोडण्यात यावे आणि सीना धरणातून उपसा सिंचन करून पंपाच्या सहाय्याने ते मेहकरी धरणात सोडण्यात यावे आणि कालवा समितीची तात्काळ बैठक बोलवावी अशी पत्र देऊन विनंती केली होती.ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी आ.सुरेश धस यांनी दूरध्वनीवरून पुन्हा याबाबत विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित विभागाला सुचना दिल्यामुळे दि. दि.३० सप्टेंबर रोजी.. रात्री पासून कुकडी प्रकल्पातून सीना प्रकल्पात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अशी माहिती मंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी मुठे यांनी आ. सुरेश धस यांना कळवली आहे.यामुळे मेहेकरी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे आनंद व्यक्त केला जातो आहे...
*************
दि.३० सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून कुकडी प्रकल्पाच्या ओव्हर फ्लो मुळे होणारे अतिरिक्त पाणी १००० क्युसेक्स क्षमतेने सीना प्रकल्पासाठी सोडणे सुरू झाले आहे.हे पाणी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत सीना प्रकल्प हेड १६५ मध्ये पोहोचू शकेल..
एस. के. शेळके
उपअभियंता
सीना पाटबंधारे उपविभाग मिरजगाव ता.कर्जत जि. अहमदनगर
***************
सध्या सीना धरणामध्ये ५३% पाणीसाठा नैसर्गिक स्त्रोतानुसार झालेला आहे आणि आणखी पाण्याचा ओघ सुरू आहे कुकडी धरणाचे पाणी सीना प्रकल्पात आल्यानंतर सीना धरण ओव्हर फ्लो असे पर्यंत आणि कुकडीचे ओव्हर फ्लो चे पाणी सुरू असे पर्यंत मेहेकरी धरणामध्ये ५० एम.सी.एफ.टी. पाणी भरून घेता येईल..
आल्हाद पालवणकर
सेवानिवृत्त उपअभियंता,
पाटबंधारे उपविभाग आष्टी जि.बीड


stay connected