जयवंत खिळदकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

 जयवंत खिळदकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन 



आष्टी ( प्रतिनिधी ):-

 तालुक्यातील मेहकरी येथील जयवंत गोपाळा खिळदकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले ते मेहकरी परिसरात नांदूर मामा या नावाने परिचित होते.मृत्यूसमयी ते ७० वर्षाचे होते. ते गालफुगी गुडघेदुखी गाई म्हशींचे दुखणे यासाठी आयुर्वेदिक औषध देत असत त्यांचा स्वभाव सरळ साधा होता प्रत्येकाबरोबर मन भरून प्रेमाने बोलत असत त्यामुळे त्यांची मेहकरी, पिंपळगाव दाणी, टाकळी अमिया,सराटेवडगांव,शिरापूर,चिंचोली,धानोरा,कडा वाहिरा,पुंडी या गावांमध्ये प्रेमाची मित्रमंडळी होती त्यांचे गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली प्राध्यापक डॉक्टर रमेश खिळदकर, मारुती खिळदकर,नंदाबाई गदादे यांचे ते वडील होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुले,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी मेहकरी नदीकाठी शनिवार दि.७ ऑक्टोंबर रोजी होणार असून ह.भ.प.कु. प्रांजल दीदी जाधव आळंदी देवाची यांचे प्रवचन होणार आहे.माजी आमदार भीमराव धोंडे यांचे ते कट्टर समर्थक होते कै.निजाम पटेल,भीमराव साके भीमराव माळशिकारे,हौसराव बाबर,बबन जगताप,यांचे ते मित्र होते.









Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.